देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी चेडगाव परिसरात पहिली दरोड्याची घटना होवून २४ तासांचा कालावधी संपत नाही तोच शनिवारी पहाटेच्या सुमारास ब्राम्हणी गावात पुन्हा दरोडा घातला आहे. पोलिसांना माञ दरोडेखोर सापडत नसुन एकामागुन एक दरोडा टाकून पोलिसांना दरोडेखोरांनी आव्हान दिले आहे.
राहुरी तालुक्यातील सोनई-राहुरी रस्त्यावर ब्राम्हणी पासून काही अंतरावर संतोष चावरे व डॉ. चावरे या बंधूंच्या घरी दरोडा टाकण्यात आला आहे. पाच ते सहा दरोडेखोर असल्याची माहिती समजते. सुरुवातीला दरोडेखोरांनी भाऊसाहेब खोसे यांच्या वस्तीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या घरातील लोक जागे असल्याने त्या ठिकाणी दरोडा घालणे अशक्य वाटल्याने त्यांनी आपला मोर्चा चावरे यांच्या घराकडे वळविला. दरोडेखोंनी चावरे यांच्या घरात घुसून हानमार सुरू केली. दरम्यान संतोष चावरे यांच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावला त्यामुळे भीतीपोटी पूर्ण कुटुंब धास्तावले. मुलाच्या आईकडून कपाटाच्या चाव्या ताब्यात घेतल्या. उचकापाचक करून काही पैसे व दागिने घेवून दरोडेखोरांनी काढता पाय घेतला. ब्राह्मणी परिसरात आशा सेविका म्हणून कार्य करणाऱ्या दिव्यांग आशा सेविका आशाताई चावरे यांच्या अंगावरील दागिने ओरबडून दरोडेखोरांनी पळवून नेले. दरम्यान शेजारील तरुणांनी या दरोडेखोरांचा पाठलाग केला. मात्र, ते ऊसात पळाले. भाऊसाहेब खोसे यांच्या वस्तीवरुन शेतातून पायी चालत चावरे यांच्या घराकडे आले होते. घराच्या मागच्या बाजूने टॉयलेट शेजारी असणारे गेट चे कुलूप तोडून आत शिरले. रात्री पाऊस झाला होता त्यामुळे चिखलाचे पाय आत घेवून पोत्याला पुसली. संतोष चावरे यांना धमकी देत तोंडावर कपडे घेऊन झोपा अशी धमकी देवून दरोडेखोरांनी त्यांच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावला.
मुलाच्या आईने मुलाला मारु नका पाहिजे ते घेवून जा असे म्हणत असताना हिंदी भाषेत कपाटाच्या चाव्या मागितल्या अंगावरील दागिने ओरबडली. गुरुवारी मध्यरात्री ब्राम्हणी चेडगाव रस्त्यावर रावसाहेब तरवडे यांच्या घरी पडलेल्या दरोड्याची घटना ताजी असतानाच चोवीस तासाच्या आतच चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली आहे. सदर घटनांचा वेळीच योग्य तपास लावून चोरीच सत्र थांबून जनतेला दिलासा मिळावा.
0 टिप्पण्या