अहमदनगर/ जावेद शेख : श्रीरामपूर येथील बैतुश्शिफा हास्पिटलचे संचालक तथा इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सलिम सिकंदर शेख व सौ. डॉ. कौसर सलिम शेख या दाम्पत्यांना शब्दगंध साहित्य परिषद (महाराष्ट्र राज्य) शाखा श्रीरामपूर, लोकरंग बहुउद्देशीय संस्था आणि कॅरियर कॉम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्र संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त "राष्ट्रसंत गाडगे महाराज गौरव पुरस्कार" देऊन सन्मान करण्यात आला.
श्रीरामपूर विधानसभा सदस्य आमदार लहुजी कानडे, श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती सौ.वंदनाताई मुरकुटे यांचा शुभहस्ते मानचिन्ह देऊन डॉ.शेख दाम्पत्यांना गौरविण्यात आले. आपला वैद्यकीय व्यवसाय सुव्यवस्थितरित्या सांभाळून गोर- गरिब उपेक्षितांची सेवा यासोबतच साहित्यिक क्षेत्रात लेखन व रमजान लेख मालिका तसेच सामाजा सामाजात सामाजिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नां करीता डॉ. दाम्पत्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष शेख मीराबक्ष खुदाबक्ष बागबान, रफीक शेख, गुंफा कोकाटे, सौ. गोसावी, रज्जाक शेख, इकबाल काकर, धोंडीराम सिंह राजपूत, कवी आनंदा साळवे, तथा साहित्य क्षेत्रातील इतर साहित्यिक, कवी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील धस यांनी केले.
0 टिप्पण्या