अहमदनगर : संत रविदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने चर्मकार विकास संघाच्या अहमदनगर येथील मुख्य कार्यालयात संत रविदास महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संत रविदास यांचे कार्य युवकांना दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी केले आहे.
यावेळी संत रविदास महाराज यांच्या कार्याचा जागर करतांना अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कवि सुभाष सोनवणे यांनी प्रस्तावना करतांना संत रविदास महाराज यांचे कार्य समतेचे व शेवटच्या घटकाला न्याय देण्यारे होते असे म्हटले. जेष्ठ सामाजिक नेते अदिनाथ बाचकर यांनी विचार मांडताना समाजातील उच्च पदावर असणार्यांनी गोरगरीब घटकाला मदत करण्यासाठी पर्यन्त करण्याचे आवाहन केले व एकजुटीने अन्याय आत्याचाराविरुध्द लढण्याची गरज असल्याचे सांगितले.
अरविंद कांबळे यांनी बोलतांना सांगितले कि समाज शिक्षणातुन मोठा झाला आहे. आता सामाजिक कार्यात पुढाकाराने मदत केली पाहिजे. वधुवर केंद्र प्रमुख श्रीपती ठोसर यांनी वधुवर केंद्राच्या माध्यमातून हजारो विवाह योग्य वधुवरांंचे जुळविण्याचे काम केले परंतु आर्थिक लुट करणार्या व्यवसायिकांना पायबंद घालण्यासाठी समाजाने जागरुख राहावे. वधुवर समितीचे अध्यक्ष इंजि तुकाराम गायकवाड यांनी २ जानेवारी २२ रोजी अहमदनगर येथे निशुल्क वधुवर मेळाव्यात मोठ्या संखेने राज्यातुन वधुवरांंनी सहभागी होण्याचे आवाहन केले. महिला अध्यक्षा सौ.रुखमनी नन्नवरे यांनी महिलांनी सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रदेश सचिव सुभाष चिंधे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा माांडतांना युवकांनी संघटनेत सहभागी व्हावे समाजाचा विकास न्यायहक्का करीता कार्य करावे. युवानेते मनिष कांबळे यांनी उपस्थितीत पदधिकारी यांचे आभार मानले.
या प्रसंगी घनदाट मामा प्रतिष्ठानचे सह सचिव राजेंद्र धस, नगर स्वतंत्र चे कार्यकारी संपादक सुभाष मुदळ, युवा जिल्हा सचिव अमोल ङोळस, गटई आघाडीचे संतोष कदम, गोपीनाथ म्हस्के, संदीप सोनवणे, दिलीप कांबळे अदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या