अहमदनगर/ जावेद शेख : ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रीन फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण व मोफत आयुर्वेदिक वृक्षवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन लोणी काळभोर कोळपे वस्ती कॅनॉल शेजारी वड, पिंपळ, करंज, कदंब, नागचाफा, मुचकुंदा, अंजन आदी प्रकारचे 351 वृक्ष ऑक्सिजन पॉईट क्र 3 वन विभाग परिसरामध्ये दत्तात्रय शेंडगे यांच्या हस्ते वृक्षारोपण तसेच वाटप करण्यात आले. कोरोना काळात सर्वांनाच ऑक्सिजनचे महत्व समजले आहे. झाडापासून नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यासाठी सर्वांनी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी केले.
यावेळी ग्रीन फाऊंडेशन लोणी काळभोर, धनगर समाज सेवा संस्था, विभा गिरिश ट्रस्ट, जनाई शिक्षण संस्था पुणे, लोणी काळभोर ग्रामस्थ तसेच जालिंदर रूपनर, युवराज दुबे, दत्तात्रय चोरमले, हेंमत कोळपे, धीरज विरकर, भाऊसाहेब देवडे, धोंडिबा कोळपे, ग्रीन फाऊंडेशन हवेली तालुका संपर्क प्रमुख बाबासाहेब यादव, भाऊसाहेब कोळपे, दादासाहेब कोळपे, जीवन जाधव, बिरूदेव भास्कर आदी उपस्थित होते.
यावेळी धनगर समाज सेवा संस्था कार्याध्यक्ष दत्तात्रय चोरमले म्हणाले, प्रत्येकाने एक तरी झाड लावणे आवश्यक आहे. वृक्षारोपण केल्यानंतर त्याचे संवर्धन करणे ही तेवढेच गरजेचे आहे. जास्तीत जास्त वृक्षारोपण करून पर्यावरणास आपण हातभारच लावणार आहोत. ग्रीन फाउंडेशन अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. यापुढेही ग्रीन फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील, अशी मला खात्री आहे. ग्रीन फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही आश्वासन दत्तात्रय चोरमले यांनी यावेळी दिले.
0 टिप्पण्या