संगमनेर शहर : तालुक्यातील कोळवाडे येथील रहिवासी व अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे चिफ फायनान्स ऑफिसर आदिनाथ लहानू काळे यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय आदर्शकार्य गौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नाशिक येथील मणुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा पुरस्कार नाशिक येथे नुकताच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, डॉ. सुधीर तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, महानंदा दुधचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख, सत्यजीत तांबे, पंकज अरूण कडू, समाजसेवक प्रा. बाबा खरात, अहमदनगर जिल्हा मजुर फेडरेशन चे संचालक नानासाहेब कानवडे, छावा क्रांतिवीर सेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष इंजि.आशिष कानवडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या