शिरसगाव येथे डॉ. मुरकुटे यांचा सत्कार

श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : शिरसगाव साेसायटीचे मार्गदर्शक व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय जी.के. बकाल पाटील यांची इच्छा व आशीर्वादामुळे श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान झाली आहे. या पुढील काळातही राजकीय व सामाजिक कार्यात शिरसगाव ग्रामस्थांनी आपल्या पाठीशी उभे राहून साथ द्यावी असे आवाहन सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी केले.

शिरसगाव सोसायटीच्या जी.के. पाटील सभागृहात नूतन सभापती डॉ. मुरकुटे यांचा सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. श्रीरामपूर तालुक्यातील जनतेने माझ्यावर विश्वास टाकल्यामुळे आपण यशस्वी होऊ शकलो आहोत. राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात व आमदार लहुजी कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्याकरिता यापुढील काळातही राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करीत असतांना तालुक्यातील जनतेने आपणास साथ दिल्यास त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही डॉ. मुरकुटे यांनी दिली. याप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक किशाेर पाटील यांनी केले. यावेळी डॉ. मुरकुटे व जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे यांचा साेसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी शिरसगाव सोसायटीचे अध्यक्ष साईनाथ गवारे, उपाध्यक्ष चांगदेव बकाल, संचालक सत्यनारायण उपाध्ये, सोपानराव गवारे, आण्णापाटील गवारे, मच्छिंद्र जयवंत गवारे, ॲड. गजानन बकाल, नेहरूनाना बकाल, बापूसाहेब काळे, निवृत्ती पाटील गवारे, बाळासाहेब गवारे, संजय गवारे, संदीप गवारे, सुभाष गवारे, विश्वनाथ गवारे आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या