श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : इपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत यांच्या नेतृत्वाखाली इपीएस ९५ पेन्शनधारकांच्या १९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता लखनौ पं.गोविंद वल्लभ पंत सांस्कृतिक उपवन निशांत गंज गोमती तट येथे होणाऱ्या महामेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी केले आहे.
या संघटनेच्या वतीने आतापर्यत गल्ली ते दिल्ली पर्यंत तहसीलदार, जिल्हाधिकारी, सर्व खासदार यांना निवेदने देऊन दिल्लीसह सर्व ठिकाणी अनेक प्रकारची आंदोलने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीसुद्धा खा हेमा मालिनी समवेत कमांडर अशोक राउत व शिष्टमंडळाने भेट घेतली व कामगार मंत्री, अर्थमंत्री यांची भेट घेतली. पंतप्रधान यांनी सकारात्मक चर्चा करून लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. अद्याप निर्णय न झाल्याने देशभर, सर्व राज्यात जिल्ह्यात सध्या मेळावे घेतले जात आहेत.
दर महिन्याला सरासरी ५००० जेष्ठ पेन्शनधारक मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे सरकारने त्वरित पेन्शन वाढीचा निर्णय घ्यावा. ४/१०/२०१६ च्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार व इपीएफओच्या पत्र दि २३/३/२०१७ अन्वये उच्च पेन्शन सुविधा द्यावी व ३१ मे २०१७ चे पत्र रद्द करावे. दरमहा रु ७५००/- पेन्शन मिळावी, मोफत वैद्यकीय सुविधा मिळावी आदी मागण्या आहेत. लखनौ येथील महामेळाव्यात आपली एकजूट, शक्ती दाखवून केंद्र सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडणे हाच या महासंमेलनाचा उद्देश आहे.
या महामेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीसिंगअण्णा जाधव, उपाध्यक्ष नारायण होन, जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, विनायक लोळगे, बापूराव बहिरट, सुकदेव आहेर, डौले, संपत मुठे, संजय मुनोत, वाळकेअप्पा, सुलेमान शेख, एस के सय्यद, अशोक देशमुख, किशोर भांगे, हासे, महिला आघाडी उपाध्यक्ष आशाताई शिंदे, एस आर जाधव, निर्मला वाघ आदी सर्वांनी केले आहे.
0 टिप्पण्या