संगमनेर - अहमदनगर जिल्हा युवक काँगेसचे सोशल मीडिया प्रमुख व महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजजीतदादा तांबे यांचे कट्टर समर्थक ऋतिक राऊत यांचा अभिष्टचिंतन सोहळा आज संगमनेरात घुलेवाडी गावा मध्ये संपन्न होणार आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची विचारधारा घराघरात पोहचविण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच सामाजिक कार्यात सतत अग्रभागी राहून तालुक्यात व जिल्ह्यात त्यांनी मोठया प्रमाणात मैत्रीचे जाळं निर्माण केलं आहे. युवकांचेही अनेक प्रश्न त्यांनी वेळोवेळी रोखठोक व निर्भीडपणे मांडले आहेत.
आजच्या या अभिष्टचिंतन सोहळ्यास महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर शिक्षक विधानपरिषद मतदारसंघांचे आमदार डॉ.सुधीर तांबे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, साखर कारखाना संचालक इंद्रजितभाऊ थोरात, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख आदी दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार असून हा अभिष्टचिंतन सोहळा आज सायंकाळी 8.00 वाजता घुलेवाडी (पाराजवळ ) विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
0 टिप्पण्या