अहमदनगर : सरकारने नविन धोरण जाहीर करून आजपर्यंतचे शेती पंपाचे वीजबिल माफ करण्यासंदर्भात जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनचे शिवाजीराजे पालवे यांनी ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने विद्युत महामंडळाचे नविन धोरण बनवावे. ज्यात सन २०२१ पर्यंत थकीत असलेले सर्व बील माप करावे, सर्व शेतकरी बांधवांना नविन धोरणानुसार नविन मोफत कनेक्शन व मिटर द्यावे, चोवीस तास वीज पुरवठ्याची व्यवस्था करावी, दरमहा बीले द्यावी मग शेतकरी नक्कीच ते भरतील. जे शेतकरी वीज वापरतील ते भरतील जे बिल भरत नाही त्यांचे कनेक्शन बंद करावे असे धोरण राबविल्यास नक्कीच फायदा होईल.
सध्याचे धोरण हे गोंधळमय आहे. दरवर्षी अचानक विद्युत पुरवठा खंडित करून बिल वसुली केली जाते. डि. पी. नुसार पैसे जमा केले जातात. त्यामुळे बिलाची रक्कम कमी होत नाही. लाईट रात्री जास्त दिवसा कमी सोडली जात होती, आता तीही ८-८ तास करण्यात आली आहे. डि. पी. दुरूस्ती, तार तुटू, शेतकर्यांनाच पैसे जमा करावे लागते मग दुरूस्ती होते. त्यात वीज पुरवठा कमी दाबाने केला जातो. या गोंधळामुळे अनेक शेतकरी कनेक्शन घेत नाहीत. डि. पी. चा लोड कमी असतो व कनेक्शन जास्त असतात. त्यामुळे मोटार पंप चालत नाहीत व शेतकरी बांधवांना त्रास होतो.
धोरण बदलुन आजपर्यंतचे वीज बिल माप करावे. यापुढे चोवीस तास वीज पुरवठा करावा, प्रत्येक गावातील घरांची संख्या प्रमाणे नविन मिटर द्यावे, प्रत्येक विहीरीवर नविन मोफत कनेक्शन द्यावे, कनेक्शनच्या संख्या नुसार नविन डि. पी. बसवावी. मग कठोर नियम लावावे अश्या पद्धतीने नविन धोरण अंमलात आणले पाहिजे, असे केल्यास महावितरण कंपनीचे उत्पन वाढेल, कर्मचार्यांचे पगारवाढ होईल व शेतकरी बांधवाना चोविस तास वीज मिळेल. बीले वेळेत भरली जातील. ना शेतकरी ना कर्मचारी नाराज होणार नाही. आंदोलने होणार नाही. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची आमदनीत करोडो रुपयांची वाढ होईल. वीज बिल माफी मुळे शेतकरी आनंदी होतील. या जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनच्या मागणीचा विचार करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
0 टिप्पण्या