श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे )- नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने राज्याध्यक्ष अर्जून कोळी यांनी राज्यातील निवडक ८१ शिक्षकांचा दिल्ली शैक्षणिक अभ्यास दौरा आयोजित करून दिल्लीतील माॅडेल स्कूल पाहणी व डायट दिल्ली यांचेकडून विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
याकामी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे स्वीय सहाय्यक डॉ.बिपीन पांडे यांचे विशेष सहकार्य मिळाले. भारतीय शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणार्या "दिल्ली शिक्षण " पध्दतीने भारतीयांसाठी शिक्षण हे वाघीणीचे दुध असते हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. गेल्या ६-७ वर्षापासून सुरू असलेल्या Delhi Education Revolution लेखा जोखा अभ्यासण्यासाठी दिल्ली डायट यांचेकडून प्रशिक्षण घेणे व माॅडेल स्कूल पाहण्यासाठी राज्याध्यक्ष अर्जून कोळी यांचे नेतृत्वाखाली ४ दिवसीय दौर्यात महाराष्ट्रातील निवडक ८१ शिक्षक सहभागी झाले होते.
दिल्ली शाळांचे माॅडेल स्कूलमध्ये रूपांतर होताना राबविल्या जात असलेल्या विविध नवोपक्रम, विविध स्तरांवरील संरचना, जिल्हा शाळा रचना, भौतिक सुविधा, टीचर्स ट्रेनिंग, गुणवत्ता विकास, अभ्यासक्रम विकास, पालक कम्युनिटी विकास, व्यक्तीमत्व विकास, Happiness Program, देशभक्ती पाठ्यक्रम, मिशन बुनियाद, जोडी ज्ञान, Teaching Approaches, या आणि अशा अनोख्या गोष्टींविषयी अतिशय सखोल असे मार्गदर्शन व प्रत्यक्ष शाळेत विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या सोबत संवाद साधून निरिक्षण करुन विविध अभुतपुर्व अनुभुतीतून माहिती आणि मन परिवर्तन करणारे क्षण शिक्षकांना पहावयास मिळाले.
सरकारी शाळेतील नेत्रदीपक भौतिक सुविधा, अवाक करणारी गुणवत्ता, शिक्षकांची प्रशिक्षणे, व प्रोत्साहन, पालकांची सहभागी उपक्रमशिलता, सर्व स्तरावरील शिक्षणविषयक तळमळ, व कृतिशिलता, ही वैशिष्ट्ये भारावून टाकणारी होती. सरकारी शाळा अशा पण होऊ शकतात असा आत्मविश्वास इतर राज्यांच्या सरकारांना, प्रशासनास देणारे संपूर्ण भारतासाठी आदर्श व्रत माॅडेल असणारे शिक्षण प्रशासन - सरकार - सरकारी शाळा पाहून शिक्षक नतमस्तक झाले. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे स्वीय सहाय्यक डॉ बिपीन पांडे यांनी शिक्षकांना सखोल असे मार्गदर्शन केले. मनोज पांडे ( Deputy director of education ) मनोज पांडे (Head of school ) सर्वोदय विद्यालय नानकपूरा दिल्ली) यांनी मार्गदर्शन केले. नील लोहिया यांनी पी पी टी द्वारे शिक्षकांना मार्गदर्शन केले शाळातील शिक्षकांनी सर्व शिक्षकांना संपूर्ण शाळा, वर्ग, परिसर पाहणी करण्यास व संवाद साधण्यासाठी मदत केली
शिक्षकांसाठी स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
यानंतर दिल्ली डायट यांचेकडून सर्व शिक्षकांना विशेष २ तासांचे " New Education Policy 2020 " याविषयावर प्रशिक्षण दिले यात शिक्षकांशी अनौपचारिक चर्चासह शिक्षकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांचे निरसन केले. प्रशिक्षणानंतर सर्वांना प्रशिक्षण घेतल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. या दौऱ्यात नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जून कोळी, कार्याध्यक्ष सुभाष कोल्हे, सरचिटणीस अरुण पवार, राज्य संघटक नवनाथ अकोलकर, राज्य महिला आघाडी प्रमुख साधनाताई साळुंके , ट्रस्ट सचिव शिवाजी राजविडे, किशोर पाडवी , संग्राम गाढवे, विकास तरटे, संतोष कारंडे, ढेंगळेसर, माया कांबळे मनिषा सुर्यवंशी, हेमाताई कुलकर्णी, भाऊसाहेब कबाडी, अमोल बोठे आदि पदाधिकारी सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या