गागरे वस्ती शाळेत स्वाध्याय पुस्तकांचे वाटप

अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी तालूक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गागरे वस्तीवरील सर्व विद्यार्थ्यांना मेजर सोपानराव रघुनाथ काकडे यांचे चिरंजीव इंजिनीयर सिद्धांत काकडे यांच्यातर्फे मोफत स्वाध्याय पुस्तकांची वाटप करण्यात आले. काकडे हे गेल्या तीन वर्षापासून न चुकता विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी स्वाध्याय पुस्तकांचे मोफत वाटप करत आहेत. यापुढेही असाच उपक्रम चालू ठेवणार असल्याचे यावेळी काकडे यांनी सांगितले.

यावेळी अनेक स्थानिक दानशूर व्यक्तींनी गागरे वस्ती शाळेसाठी अनेक भेटवस्तू दिल्या आहे. त्यामध्ये अशोकराव गोडे, डॉ शशिकांत गागरे, इंजि प्रविण गागरे, संतोष वैद्य आदींचा समावेश आहे. या स्वाध्याय पुस्तिका वाटप कार्यक्रमासाठी पत्रकार सुभाष आग्रे, कमलेश विधाटे, सुशिलकुमार गागरे, शेखर गोडे, शरद गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश गागरे, मुख्याध्यापिका श्रीमती उषा गागरे, चांगदेव काकडे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या