अहमदनगर/ जावेद शेख : श्रीरामपूर येथे डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी वाचन संस्कृती रुजवून 'वाचा तर वाचल'अशा भूमिकेतून सेवाभावाने ही चळवळ सुरु ठेवली हे कौतुकास्पद असून वाचन माणसाला जगण्याची आणि सुसंस्कृत जाणीव देते असे मत पुणे येथील भाजप महिला आघाडीच्या श्रीमती सविता कुंभार यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित 'महिला आणि वाचन' याविषयीं मत व्यक्त करताना सविता कुंभार बोलत होत्या. प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी सविता कुंभार आणि महिला गटाचे स्वागत केले. सौ. आरती उपाध्ये यांनी आमची वाचन चळवळ याविषयी भूमिका मांडली. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे सर्वांना मोफत पुस्तके देऊन परिसरात आणि संशोधक वृत्ती कधी वाढविली जात आहे याविषयी प्रसंग सांगितले.
सविता कुंभार यांनी पुणे येथे अशी मंडळे हवीत पण ग्रामीण भागात अशी वाचन संस्कृती वाढत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. पुणे येथील महिला मंडळ उपस्थित होते त्यांना 'जीवनचिंतन ' आणि इतर पुस्तके देऊन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या