कै. संभाजीराजे रामचंद्र थोरात यांची ८८ वी जयंती स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्था रायतेवाडी येथे साजरी

संगमनेर शहर : येथील स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्था रायतेवाडी येथे आज शनिवार दि. १९ डिसेंबर रोजी कै. संभाजीराव थोरात (दादा) यांची ८८ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी येथील बालाश्रमातील मुलांना भेट देऊन स्नेहभोजन देण्यात आले.

कै. संभाजीराव रामचंद्र थोरात यांची जयंती साईबाबा हॉल मध्ये साजरी करण्यात आली. यावेळी दादांच्या प्रतिमेस रविंद्र थोरात यांनी पुष्पहार घालून साईबाबांची आरती व प्रसादाचे वाटप करण्यात आले. संतोष पवार व त्यांचे मित्र यांनी या संस्थेची स्थापना सन १९९९ मध्ये केली. तेंव्हापासून आजतागायत स्वयंप्रेरित संस्था एडस् बाधित मुलांचा सांभाळ करून त्यांना शिक्षण व योग्य संस्कार करत आहे. तसेच स्वयंप्रेरित संस्थेने निराधार वृद्धांना देखील मदतीचा हात देऊन आधार दिला आहे.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नामदेव राहाणे, संस्थापक संतोष पवार, संचालक प्रितम मिसाळ उपस्थित होते. तसेच जयंती कार्यक्रमासाठी दादांवर निष्ठा व प्रेम असणारे श्रीराज थोरात, छावा क्रांतिवीर सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशिष कानवडे, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष रविंद्र डुबे, गणेश फरगडे, संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश आव्हाड, संकेत नवले, संकेत कोल्हे, राहुल आव्हाड, सुहास सातपुते, भाऊसाहेब उगले आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या