प्रा. गुंड यांना क्रांतिसूर्य फाऊंडेशन कोल्हापूर चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

राहुरी शहर/अशोक मंडलिक : क्रांतिसूर्य फाऊंडेशन कोल्हापूर यांचा राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोजी छत्रपती शाहू महाराज सभागृह, कोल्हापूर येथे पार पडला.

या पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे नगरसेवक राजू दिंडोरले होते तर कोल्हापूर समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, समतावादी चळवळीचे उपाध्यक्ष प्रा. प्रकाश नाईक, क्रांतीसुर्य फाउंडेशन, कोल्हापूरचे अध्यक्ष विशाल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म २८ नोव्हेंबर दिवस हाच शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमूख वक्ते प्रकाश नाईक यांनी केले. महाराष्ट्रातून अध्यापनाचे पवित्र काम करण्या व्यतिरिक्त आपण समाजाचे काही देणे लागतो हा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या शिक्षकांचे प्रस्ताव क्रांतिसूर्य फाऊंडेशन कोल्हापूर ने संपूर्ण महाराष्ट्रातून मागवले होते.

त्यात प्रा. मुकूंद बाबसाहेब गुंड, सहाय्यक प्राध्यापक इंग्रजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयं कोल्हापूर येथे कार्यरत असलेले व राहुरी खुर्द गावचे रहिवाशी यांना राहुरी व कोल्हापूर येथे केलेल्या सामजिक कार्यासाठी दि. ८ डिसेंबर २०२१ रोजी कोल्हापूरचे नगरसेवक राजू दींडोरले यांचे हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. हर्षदा परीट यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या