श्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथे वर्षा, दोन वर्षापासून बिबट्याचे दोन तीन बछडेसह वास्तव्य आहे. परिसरात फिरून आल्यावर ठराविक ठिकाणी उसाच्या शेतात बिनधास्त राहणे असा दिनक्रम चालू आहे.
वनखात्याला कळविले तरी कधी काळी एखाद्या वेळेस पिंजरा लावायचा. वनखात्याकडे पिंजरे अपुरे असल्याने तातडीने येथून हलवायचा दुसरीकडे न्यायचा. त्यामुळे येथील ग्रामस्थ, शेतकरी कायम दहशतीखाली आहेत. जीव मुठीत धरून शाळेत, शेतावर, नोकरी आदी ठिकाणी जावे लागते. गावात वनखात्याचा पिंजरा कधी येणार याकडे सारखी विचारणा होत आहे.
दि. १४ डिसेंबर रोजी रात्री १०-४५ वाजता बोंबले वस्ती परिसरात शंकर यादव यांच्या वस्तीवरील ५ फुट उंचीच्या कंपाउंड वरून बिबट्याने उडी मारून एका शेळीचे नरडे फोडले. अशी माहिती रवींद्र पवार यांनी दिली. पण याकडे कोणी लक्ष देणार आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
0 टिप्पण्या