श्रीरामपूर[ बाबासाहेब चेडे ] : पेट्रोल व डिझेलचे भाव सारखे वाढत असल्याने गरीब व मध्यम वर्गीयांचे फार हाल होताना दिसत आहेत. त्यासाठी झारखंड सरकारचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी फक्त दुचाकी गाड्यांसाठी येत्या २६ जानेवारीपासून पेट्रोलचे दर प्रति लिटर रु २५ ने कमी करण्याचा निर्धार केला आहे.
नोव्हेंबरमध्ये केंद्राने देशभर मोठे कर कपात करण्याची घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी काही राज्यात भाजप प्रणीत सरकारने केली आहे. एक्साईज ड्युटीमधून पेट्रोल रु ५ प्रतिलिटर व डीझेल रु १० प्रतिलिटरने २२ राज्यात कपात करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुद्धा पेट्रोलचे दर रु २५ प्रतिलिटरने कमी करण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी माजी प.स.सदस्य व श्रीरामपूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन गणेशराव मुदगुले यांनी केली आहे.
0 टिप्पण्या