डॉ.श्रीकांत भालेराव यांची 'आनंदवारी' श्रद्धाप्रवासाची- ह.भ.प.भास्करगिरी महाराज

अहमदनगर/ जावेद शेख : प्रवास हा आनंद आणि श्रद्धेचा असतो, वारी ही भक्ती आणि संस्काराची असते, डॉ. श्रीकांत भालेराव हे श्रद्धाशील सेवाशील वारकरीच आहेत, त्यामुळेच त्यांनी लिहिलेली 'आनंदवारी 'ही श्रद्धाप्रवासाची आहे असे उदगार देवगड तीर्थक्षेत्राचे प्रमुख ह.भ.प.भास्करगिरी महाराज यांनी काढले.

येथील वैद्यकीय प्रसिद्ध लेखक डॉ. श्रीकांत भालेराव यांनी आपल्या 'आनंदवारी 'या पुस्तकाचे प्रथम पूजन ह.भ.प.भास्करगिरी महाराज यांच्या शुभहस्ते पूजन केले. ग्रन्थपालखी घेऊन देवगड (ता.नेवासा) येथे हे पूजन करण्यात आले. त्याप्रसंगी महाराज बोलत होते.

प्रकाशिका डॉ. सोनल भालेराव यांनी पुस्तकांची माहिती दिली. डॉ. श्रीकांत भालेराव यांनी बाबांचे पूजन केले. भास्करंगिरी महाराज यांचे पवित्र हात आपल्या पुस्तकास लाभल्याबद्दल डॉ. भालेराव यांनी समाधान व्यक्त केले.

हे पुस्तक जनमनास नक्कीच आवडेल असा आशीर्वाद ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांनी यावेळी दिला याप्रसंगी अनेक भक्तगण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या