मेळघाट प्रकल्पाचे जनक यांची प्राथमिक शाळेला भेट...

अहमदनगर/ जावेद शेख : पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी ऊरळी कांचन टिळेकर मळा प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुलांनी याच वयामध्ये योग्य मार्ग निवडावा तरच पुढचे भवितव्य सुखमय जाईल असे डाॅ कोल्हे यांनी सांगितले.श

ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, माता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आण्णा भाऊ साठे, या थोर महान थोर व्यक्तींचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. यावेळी या महान व्यक्तींविषयी डॉ कोल्हे यांनी माहिती दिली.  प्रत्येकाने भारत जोडो या उद्दीष्टाने डॉ मनीभाई देसाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावे, त्याचबरोबर मुलांनी मजबूत राहण्याकरता व्यायामाविषयी जागृती केली.

आज कोल्हे हे उरळी कांचन येथील आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले व त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्याकरता आले होते. यावेळी त्यांनी मणिभाई देसाई यांच्या बाईक संस्थेला भेट दिली. बायफ संस्थेची सखोल माहिती संस्थेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत मनोहर कांचन यांनी बायफ संस्थेची व महात्मा गांधी विद्यालय आणि उरुळी कांचन भवरापूर, टिळेकरवाडी  येथील ऐतिहासिक माहिती डॉ. कोल्हे यांना दिली.

पद्मश्री डॉ. रवींद्रजी कोल्हे व पद्मश्री डाॅ. स्मिताताई कोल्हे यांच्या हस्ते टिळेकर मळा प्राथमिक शाळेत वृक्षरोपण करण्यात आले. तसेच कोल्हे व सौ स्मिताताई कोल्हे यांनी विद्यार्थीना मार्गदर्शन केले. यावेळी भवरापूरचे माजी सरपंच सुभाष साठे यांनी पद्मश्री रविंद्रजी कोल्हे, व पद्मश्री स्मिताताई कोल्हे, आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांचा शााल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला.

यावेळी ऊरूळी कांचनचे ग्रामसेवक वाय. जे. डोळस, ग्रामपंचायत सदस्य सुनिल तांबे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य राजेंद्र टिळेकर, पोपटराव ताम्हाणे, बाळासाहेब चौवरे, सचिन टिळेकर, टिळेकर मळा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापीका सौ शहा मॅडम तसेच शिक्षकवृंद व इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या