शेतकऱ्यांची महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी करताच विद्युत रोहित्र चालु...

संगमनेर : शेतकऱ्यांच्या वतीने छावा क्रांतिवीर सेनेकडून नुकसान भरपाईची मागणी महावितरणचे धांदरफळ कक्ष सहाय्यक अभियंता श्री गडाख यांच्याकडे निवेदनाद्वारे करताच पेमगिरी येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, चार ते पाच दिवसांपूर्वी पेमगिरी येथील शेती पंपाचा वीज रोहित्र बंद करून विद्युत पुरवठा महावितरण कंपनी कडुन खंडीत करण्यात आला होतो. तो पुर्वरत चालु होण्यासाठी आज दि. १३ डिसेंबर २०२१ रोजी महावितरण कंपनीच्या धांदरफळ येथे कार्यालयात छावा क्रांतिवीर सेना, शहागड युवा प्रतिष्ठान, अखिल भारतीय क्रांतीसेना व शेतकर्यांनी विद्युत कायदा २००३ च्या तरतुदीनुसार ज्या दिवशी रोहीत्र बंद केले त्या दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रति तास ५०/- रूपये नुकसान भरपाईची मागणी केली. या चर्चेत महावितरण कंपनीच्या कारभार तसेच शेतकऱ्यांना मिळत असलेल्या सेवेबद्दल चर्चा करण्यात आली. आज संध्याकाळपर्यंत पेमगिरी येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आल्याने शेतकर्यांचे चेहर्यावर समाधान झळकत होते.

यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आशिष कानवडे, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र डुबे, तालुका अध्यक्ष इंजि. गणेश थोरात, तालुका उपाध्यक्ष सचिन गांजवे, शहागड युवा प्रतिष्ठानचे निलेश डुबे, अखिल भारतीय क्रांतिसेनेचे युवक तालुका अध्यक्ष बाळासाहेब भोर सावरचोळ सरपंच सौ. अनिता कानवडे, प्रमोद डुबे, वाल्मिक कोल्हे, संकेत कोल्हे, गणेश शेटे, दत्ता शेटे, अक्षय डुबे, प्रणय डुबे, विक्रम डुबे, चैतन्य डुबे, सुरज डुबे, कौठे, धांदरफळ, पेमगिरी, नादुरी, सावरचोळ येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या