ग्रीन फाउंडेशनच्या वतीने लसीकरण शिबीर संपन्न

अहमदनगर/ जावेद शेख : पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या मार्फत त्याचप्रमाणे मातोश्री हॉस्पिटलच्या सहकार्यातून २४ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९:०० ते ४:३० वाजेपर्यंत कोविडशिल पहिला व दुसरा डोसचे लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आली होते.

शिवराज नगर, रहाटणी याठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी परिसरातील नागरिकांनी या लसीकरणाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला असे प्रतिपादन ग्रीन फाउंडेशन शाखा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष राकेश नखाते यांनी केले.

ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना म्हणाले कोरोणा, ओमायक्रोनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि ओमायक्रोन विषाणु वाढता प्रसार त्याच्यामुळे नागरिकांच्या हिताकरिता कोविडशिल लस दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमाचे प्रामुख्याने आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वैद्यकीय विभागीय डॉ. प्रफुल्ल तपशालकर यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब कोळपे, पै.संतोष चांदेरे त्याचप्रमाणे दत्तात्रय शेंडगे, हरीभाऊ नखाते, हरेश आबा नखाते, सतीश सोनवणे, संजय गोडंबे, प्रसाद नखाते, प्रमोद नखाते, नवनाथ माने ई. मान्यवर यांच्यासमवेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या