विलास लाटे/पैठण : ग्रुप ग्रामपंचायत पांगरा-शिवणी अंतर्गत पैठण तालुक्यातील शिवणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक व गावात ड्रेनेज लाईन कामाचे भुमिपुजन बुधवारी (२२ डिसेंबर) सरपंच अतुल क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अशोक काळे, जाफर पठाण, सदस्य प्रतिनिधी शामद शेख, ग्रामसेविका बेबी राठोड यांच्यासह गावातील नंदुभाऊ खोतकर, शिवराम काळे, गणेश काळे, काशीनाथ काळे, सुनिल खोतकर, चांद पठाण, आयुब पठाण, अस्लम पठाण, मधुकर कोरडे, भाऊसाहेब करडे, गणेश कोरडे, ज्ञानदेव काळे, ग्रामपंचायत कर्मचारी सुदाम कातबणे, नजीर शेख यांच्यासह मुख्याध्यापक कैलास दळवी, शिक्षक शकील पठाण, संतोष थोरात, सविता दारकुंडे सह गावातील नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या