अहमदनगर/ जावेद शेख : ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डोर स्टेप स्कूल यांच्या माध्यमातून रहाटणी येथील शिवराज नगर या ठिकाणी मोफत १ ली ते ५ वी शिक्षण घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
लहान गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी याठिकाणी पहिली ते पाचवी मोफत क्लास सुरू करण्यात आला आहे. हा क्लास आजपासून सुरू झाला आणि पहिल्याच दिवशी जवळपास 35 ते 40 विद्यार्थ्यांचा समावेश या क्लासमध्ये आज सुरू झाला. शिक्षण घेण्यासाठी याकरिता विद्यार्थ्यांना शालेय वस्तू ज्या काही लागणार आहेत त्या सर्व काही पिंपरी-चिंचवड ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत पुरविण्यात येणार आहे.
कोरोना काळात अडचणींना आज नागरिकांना सामोरे जावे लागत आहे आणि जे काही गोरगरीब हतबल झाले आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरीता एक हातभार म्हणून आणि शिक्षणा वाचून वंचित राहणार नाही याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरिता ग्रीन फाऊंडेशनचे आधारस्तंभ बाळासाहेब कोळपे, पै.संतोष चांदेरे, ग्रीन फाऊंडेशन संस्थापक/अध्यक्ष अमित जगताप, पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष राकेश नखाते आदी उपस्थित होते.
यावेळी संजय तात्या गोडांबे, नवनाथ माने, हरेश नखाते, बाबासाहेब जगताप, हरिभाऊ नखाते, शरद नखाते, प्रसाद नखाते, संपत नखाते या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी राकेश नखाते यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 टिप्पण्या