मराठा निर्णय २०२२ चे पुणे येथे प्रकाशन

दिनदर्शिकेचा स्तुत्य उपक्रम - प्र.राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे

राहुरी शहर/अशोक मंडलिक : नगर जिल्हा मराठा महासंघाने नवीन वर्षाच्या मराठा निर्णय या दिनदर्शिका काढण्याची परंपरा गेली अकरा वर्षा पासून कायम जपली असून हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रभारी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केले. २०२२ या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पुणे येथे मराठा महासंघाच्या राष्ट्रीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले.

नगर जिल्हा मराठा महासंघाचे वतीने गेली अकरा वर्षा पासून मराठा निर्णय या दिनदर्शिकेचे निर्मीत करण्यात येते. पुढील २०२२ या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेची नुकतीच निर्माण करण्यात आली. त्याचे प्रकाशन पुणे येथे मराठा महासंघाचे प्रभारी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोढरे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. कोंढरे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. आगामी काळात नगर जिल्ह्यात मराठा महासंघ अधिक सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची ताकद लावणार असून संघटना वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

या वेळी गुलाब गायकवाड, अमर पवार, सचिन आडेकर, धनंजय जाधव, अ‍ॅड. श्रीराम पिंगळे, नगर जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव डौले, संयुक्त सरचिटणीस रमेश बोरुडे, राहुरी शहर अध्यक्ष प्रदीप भुजाडी, कुंडलीक भुजाडी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र काळे आदी उपस्थित होते.
नवीन वर्षात जिल्हात भव्य मेळावा - शिवाजीराव डौले
येत्या नवीन वर्षात नगर जिल्ह्यातील मराठा महासंघाच्या पदाधिकारी यांचा भव्य मेळावा प्रभारी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार असून या मेळाव्यात समाजातील तरुणांसाठी मार्गदर्शन शिबिर तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मराठा महासंघाचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव डौले यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या