श्रीगोंदा/ सुभाष दरेकर : अवकाळी पाऊसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. या नुकसानीची तात्काळ पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तहसीलदार कुलथे यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यात अवकाळी पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. कोराना सारख्या माहामारीमुळे शेतकरी अगोदरच कर्जबाजारी झाला आहे व आत्ता पिकांचे दोन पैसे येणार तोच अवकाळी पाऊसाचे संकट शेतकर्याच्या मानगुटीवर कोसळले त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
आपला देश कृषीप्रधान देश आहे व शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच अवकाळी पाऊसाने कांदा, द्राक्षे, डाळींब, फळभाज्या, ज्वारी, तुर आशा प्रकारच्या पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची तात्काळ पाहणी करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी तहसीलदार कुलथे यांना निवेदन देण्यात आले.
नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई मिळाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी दिला. यावेळी माजी जि. प. सदस्य अनिल ठवाळ, कुकडी कारखान्याचे व्हा. चेअरमन बाळासाहेब उगले, बाजार समितीचे संचालक भास्कर वागस्कर, नागवडे कारखान्याचे माजी संचालक अंबादास दरेकर, तांदळीचे उपसरपंच राजेंद्र भोस, हिरडगावचे माजी सरपंच मुक्ताजी जाधव, खाली ग्राम उद्योगचे चेअरमन भगवान गोरखे, मिनीनाथ भोईटे, हनुमंत कोथिंबीरे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.
0 टिप्पण्या