हुकुमशाहीच नव्हेतर लोकशाही देशांमध्येही मानवी हक्कांचे होतेयं उल्लंघन - प्रो. डॉ. सुनील कवडे

राहुरी / बाळकृष्ण भोसले : २० वे शतक हे प्रचंड संक्रमणाचे शतक आहे. शासनाचे कर्तव्य आणि मानवी हक्क हे सर्व नैसर्गिक हक्क आहेत. मूलभूत हक्क हे नैसर्गिक हक्क आहेत. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वासाठी ते आवश्यक आहेत. मानवी हक्क कुणी कुणाला द्यावे लागत नाहीत ते असतातच. हुकुमशाहीच नव्हेतर लोकशाही देशांमध्येही मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य व अहमदनगर महाविद्यालयाच्या गांधी अध्ययन केंद्राचे संचालक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रो. डॉ. सुनील कवडे यांनी केले.

तालुक्यातील सात्रळ येथील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन कार्यक्रम प्रसंगी डॉ. कवडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब नवले होते.

अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब नवले म्हणाले, भारतीय राज्यघटनेचा सरनामा, प्रकरण तीन तसेच राज्याची मार्गदर्शक तत्वे यामध्ये मानवी हक्काविषयी माहिती येते. अधिकारावर आक्रमण झालं की न्यायव्यवस्था आहे.

कार्यक्रमाचे समन्वयक सात्रळ महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. एकनाथ निर्मळ यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी उपप्राचार्य प्रो. (डॉ.) सोमनाथ घोलप, प्रा. दीपक घोलप, प्रा. पांडुरंग औटी, प्रा. अजय बनसोडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. नवनाथ शिंदे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या