महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या स्टॉलला ॲग्रोव्हिजन प्रदर्शनात शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद

नागपूर येथील ॲग्रोव्हिजन प्रदर्शनात महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा सहभाग

राहुरी शहर/अशोक मंडलिक : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या जागतिक बँक अर्थसाहित, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प, नवी दिल्ली पुरस्कृत हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापन प्रकल्पाने नागपूर येथील दि. 24 ते 27 डिसेंबर, 2021 दरम्यान आयोजीत अॅग्रोव्हिजन कृषि प्रदर्शनात सहभाग घेतला. या प्रदर्शनात हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन प्रकल्पाने तयार *केलेले* नाविन्यपूर्ण अविष्कार प्रदर्शित केले असून या प्रात्यक्षिकांना शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राहुरी कृषि विद्यापीठाच्या या प्रदर्शन स्टॉलला केंद्रिय मंत्री, रस्ते, वाहतुक आणि परिवहन, भारत सरकार ना. नितिनजी गडकरी व केंद्रिय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री ना. नरेंद्रसिंह तोमर यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट दिली.
या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलतांना ना. गडकरी म्हणाले शेतकर्यांना जर शेतीच्या विविध कामासाठी ड्रोनचा वापर अधिक किफायतशीर करावयाचा असेल तर ड्रोनची किंमत कमी करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत लिथियम बॅटरीवर चालणारे ड्रोन ऐवजी जैविक इंधनावर चालणारे ड्रोनची निर्मिती केली तर ड्रोनची किंमत कमी होवून त्यांचा अवलंब शेतकर्यांना फवारणीसाठी करणे किफायतशीर होईल. विद्यापीठाने उभारलेल्या या प्रदर्शनात फुले रोबो व ड्रोनचे प्रात्यक्षिक, ऑटो पी.आय.एस., स्मार्ट पी.आय.एस. स्वंयचलीत पंप प्रणाली आणि सेंसर आधारीत सिंचन प्रणाली या तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. कृषि यंत्रे आणि शक्ती अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे, डॉ. गिरिष भणगे, इंजि. योगेश दिघे, डॉ. प्रज्ञा जाधव आणि डॉ. अंजली मुसमाडे यांनी मान्यवरांना व उपस्थित शेतकर्यांना या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली.

सदर प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, प्रकल्पाचे प्रमुख सं शोधक डॉ. सुनिल गोरंटीवार व सहसंशोधक डॉ. मुकुंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक व प्रदर्शनाचे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या