शिक्षकीपेशात चांगले काम केले तर फळ चांगले मिळते -अंजुम शेख

श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : शिक्षकी पेशामध्ये प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केल्यास देशाचे भावी नागरिक चांगले तयार होतात. स्वतःच्या व इतरांच्या जीवनात देखील आनंद निर्माण करण्याचा हेतू साध्य होतो. हे काम फक्त शिक्षकच करू शकतात, असे भावोद्गगार नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख यांनी नगरपालिका शाळा क्र ६ श्रीरामपूरचे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक ताराचंद नारायण पगारे यांचे सेवापूर्ती सोहळ्यात काढले.

ताराचंद पगारे यांचे प्राथमिक शिक्षण हे नगरपालिकेच्या शाळेमध्ये झाले व त्याच नगरपालिकेत शिक्षक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. ३४ वर्षे सेवा त्यांनी केली त्यांना या कालावधीत शिक्षण मंडळ, विविध सामाजिक संस्था व संघटना यांनी पुरस्कार दिले. त्यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळ, नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाचे विविध पदे भूषविली. त्यांना सन २०२१ चा राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.

शांत व संयमी स्वभावामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात फार मोठा मित्रपरिवार मिळविला. श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी ताराचंद पगारे यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार केला. सेवापूर्ती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे हे होते.

कार्यक्रमासाठी श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक मुक्तारभाई शाह, रवी पाटील, प्रकाश ढोकणे, कलिम कुरेशी, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती रियाजभाई पठाण, नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्य संघटक नवनाथ अकोलकर, जिल्हा संघाचे अध्यक्ष फारुकभाई शाह, प्राथमिक शिक्षक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष संजय शिंदे, राज्य सदस्य विजय शेळके, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष प्रकाश दादा खोले, व विद्यमान अध्यक्ष लखन लोखंडे, रुपेश गुजर, किशोर त्रिभुवन, शिक्षक संघाच्या शहर अध्यक्षा सौ रजनी कर्डीले, सदिच्छा मंडळ अध्यक्षा सौ प्रतिभा जयकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर शिंदे, रज्जाक पठाण, मार्गेश शिंदे, अरुण जोजारे, विलास गोडसे, विश्वासराव व्यवहारे, अशोक बागूल, नितिन जाधव, शंभूक वस्तीगृहाचे अधिक्षक अशोक दिवे, चक्रधर सोनवणे, पोलिस पाटील बाळासाहेब पवार, महेबूबभाई शाह, नारायण कोतकर, विलास निकम, शब्बीर शेख, प्रकाश माने, अल्ताफ शाह, राजू भोसले, मुख्याध्यापिका अलका कुर्हे, कृष्णाताई थोरे, अजय शिंदे, सतिष खामकर, सोमनाथ बुर्हाडे, ईसा आत्तार, अशोक चोथे, फैजल चाऊस, अभिजीत गौडाजे, सादिक शेख, संभाजी त्रिभुवन, सुभाष लांडगे, हिराचंद पगारे, संजय पगारे, रवी पगार, बाळासाहेब पगारे, सौ रंजनाताई पवार, पोपटराव वाकचौरे, जालंधर बलमे, कृष्णा जाधव, राहूल निमकर, गोविंद जाधव, सौ संगिता अकोलकर, सौ अनिता पगारे, सौ सुनंदा शिंदे, सौ राजश्री कोतकर आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी लता औटी, सौ रजनी कर्डीले, श्रीमती कृष्णाताई थोरे, फारुकभाई शाह, कुमारी काजल पगारे, चक्रधर सोनवणे, बाळासाहेब पवार, अल्ताफ शाह, नगरसेवक प्रकाश ढोकणे, रवी पाटील, मुक्तारभाई शाह आदिंनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनी केले. यावेळी पगारे सर यांना श्रीरामपूर शिक्षण मंडळाच्या वतीने प्रा. फंडाचा चेक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक संघ, शिक्षण मंडळ, शाळा व विविध सामाजिक संस्था व संघटना, नातेवाईक, मित्रपरिवार यांनी पगारे सर यांचा सपत्नीक सत्कार केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ कांचन मुसळे, विजय शेळके, श्रीमती अरुणा लोखंडे, श्रीमती मनिषा सांगळे, श्रीमती लता औटी, श्रीमती योगिता हुडे, श्रीमती यास्मीन शेख, सुनिता थोरात, श्रीमती वर्षा वाकचौरे, श्रीमती अनिता बढे, श्री सचीन शिंदे, शरद नागरगोजे, कल्हापूरे सर, मंदाकिनी गायकवाड, कल्पना गायकवाड, दिपाली शेळके, प्राची लोळगे आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ योगिता हुडे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नवनाथ अकोलकर यांनी तर आभार विजय शेळके यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या