राहुरी : तालुक्यातील कोंढवड येथील विविध विकास सेवा संस्थेच्या माजी चेअरमन व कोंढवड च्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. आशादेवी उत्तमराव म्हसे यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती सरपंच सेवा संघाचे राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे यांनी दिली आहे.
सदर कोंढवड च्या सरपंच विवेकानंद नर्सिंग होमचे माजी अध्यक्ष व डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक ज्येष्ठ नेते उत्तमराव म्हसे पाटील यांच्या सौभाग्यवती आहेत. त्यांना पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती तथा माजी सरपंच साहेबराव म्हसे व शिवसेना नेते संभाजीराव पेरणे यांनी अभिनंदन केले आहे.
सरपंच सेवा संघाच्या वतीने दरवर्षी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच आध्यात्मिक क्षेत्रात प्रामाणिकपणे उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तिंना सरपंच सेवा संघाच्या वतीने दरवर्षी सन्मानित करण्यात येऊन यावर्षी २०२१ चा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार कोंढवड च्या विद्यमान प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. आशादेवी म्हसे यांना जाहीर करण्यात आलेला आहे.
दि. २३ डिसेंबर २०२१ रोजी अहमदनगर येथील माऊली संकुल सभागृह या ठिकाणी सकाळी १२ वा. सरपंच सेवा संघाच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार आहेत. सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे, सोशल मिडिया प्रमुख रोहीत पवार, व राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे यांनी या पुरस्कारासाठी कोंढवडच्या लोकनियुक्त सरपंच यांची निवड जाहीर केल्याबद्दल कोंढवडच्या उपसरपंच कविताताई म्हसे, बंडू म्हसे, माजी उपसरपंच इंद्रभान म्हसे, ज्ञानेश्वर म्हसे, संभानाना म्हसे, संदीप शेजवळ, मिनाक्षी म्हसे, जयश्री म्हसे, सुनिता म्हसे आदींनी सरपंच सेवा संघाचे आभार मानले आहेत.
0 टिप्पण्या