राहुरी / बाळकृष्ण भोसले : महिलांवरील होणाऱ्या अन्याय अत्याचारासंदर्भात सामाजिक संघटनांनी जागरूक असले पाहिजे आपल्या अवतीभोवती अबला, विद्यार्थीनी, व महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या बरोबरीने आपण आपली जबाबदारी ओळखून योगदान देणे महत्त्वाचे असून महिला आयोग त्याद्रुष्टीने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांनी केले.
श्री संत सावता माळी युवक संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अशोक तुपे यांनी सौ. रुपालीताई चाकणकर यांची सदिच्छा भेट घेत त्यांचा सत्कार केला. प्रसंगी महिलांच्या प्रश्नावर त्यांनी चर्चा करताना सौ. चाकणकर बोलत होत्या.
सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी याबाबत सतर्क राहून समाजातील वंचित, उपेक्षित व शेवटच्या घटकातील पिडीत महिलांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरजही त्यांनी प्रसंगी व्यक्त केली श्री संत सावता माळी युवक संघाचे काम अशा घटकांसाठी निश्चितपणे गौरवास्पद असून संघाच्या कामाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आगामी काळात यासाठी महिला सक्षमीकरणासाठी निश्चित धोरण घतले जाणार असल्याचे त्या सत्कारप्रसंगी म्हणाल्या.
प्रसंगी संघाचे पदाधिकारी सुवर्णा शिंदे, दिपक साखरे, भारत सत्रे, प्रशांत शिंदेसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या