पैठण/विलास लाटे : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेचा सत्कार सन्मान सोहळा औरंगाबाद येथे रविवारी राष्ट्रीय कोषाध्यक्ष कुलदीप सिंह, राष्ट्रीय प्रमुख महासचिव हौशिला प्रसाद दुबे, महाराष्ट्र राज्य संघटक परेश शहा यांच्या उपस्थित पार पडला. औरंगाबाद जिल्ह्यातील डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे हा सन्मान सोहळा कोरोनाचे नियम पाळुन पार पडला.
यावेळी सर्व प्रमुख पाहुणे पदाधिकारी व कोरोना काळात तसेच संघटनेत चांगले काम केलेले पदाधिकारी यांना राष्ट्रीय कोषाध्यक्ष कुलदिप सिंह, प्रमुख महासचिव हौशिला प्रसाद दुबे, राज्य संघटक परेश शहा यांच्या हस्ते शाल, स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करून सन्मान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र अ. स. कार्याध्यक्ष एच. आय. शेख, अल्पसंख्याक मराठवाडा अध्यक्ष के. ए. काझी, मराठवाडा ओबीसी अध्यक्ष अशोक गरुड, मराठवाडा अध्यक्ष सुधीर बोरगावकर, महिला प्रदेशाध्यक्ष स्नेहा बोरगावकर, मराठवाडा युवा अध्यक्ष संदीप गवळी, मराठवाडा युवा कोषाध्यक्ष आब्बास पठाण, औरंगाबाद ग्रा.युवक जिल्हाध्यक्ष शेख इलियास, जिल्हा कोषाध्यक्ष डाँ.शब्बीर बेग, युवा जिल्हा सचिव सोहेल मेमन, अ.स.जिल्हा सचिव कलीम बाॅक्सर, ॲड. दंताळ, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक रंगनाथ हिवाळे, ॲड खंडागळे, अ. स. पैठण तालुका अध्यक्ष शेख राजु, पैठण ता.कार्यध्यक्ष शाहरुक पठाण, पैठण ता.महिला अध्यक्ष निर्मलाताई, जुबेर शेख, रमेश पोळके, औरंगाबाद युवा कार्याध्यक्ष राहुल रामटेके, विनोद गोराडे, पत्रकार फेरोज मिर्झा, धम्मा जाधव, सुंदरसिंग राजपुत, गणेश बगळे तसेच मराठवाडा व औरंगाबाद व परिसरातील येणारे प्रमुख पाहुणे यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या