ग्रामीण युवकांनी शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यावी-मा. आ. पांडुरंग अभंग

राहुरी शहर/अशोक मंडलिक : ग्रामिण भागातील युवक शेतक-यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग करून शेती क्षेत्राला पुर्वप्रतिष्ठा मिळवून द्यावी असे प्रतिपादन मा.आ. पांडूरंग अभंग यांनी केले. श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने, ता.शेवगाव यांनी आयोजित ग्रामीण युवक प्रशिक्षण वर्गाचे सांगता व प्रमाणपत्र वितरण प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले.

कृषि विज्ञान केंद्र येथे रोपवाटीका व्यवस्थापन व उद्योजकता विकास आणि शेतमाल प्रक्रिया उद्योग या तीन विषयांवर ग्रामीण भागातील युवकांसाठी 4 दिवस प्रशिक्षण वर्ग आयोजीत करण्यात आला होता. आज कृषि विज्ञान केंद्र येथे येऊन समाधान झाले व लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील यांची आठवण येते, कारण त्यांच्याच दुरदृष्टीतुन हे साकार झाले आहे असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी काशिनाथ नवले यांनीही मार्गदर्शन केले, त्यांनी कृषि विज्ञान केंद्र, येथे शेतकरी हिताचे वेगवेगळे प्रयोग होत आहेत व त्याचा लाभ आपल्या भागातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे सांगितले.

कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.श्यामसुंदर कौशिक यांनी केव्हीके हे सदैव शेतकऱ्यांसाठी बांधील असून शेतमालाचे मूल्यवर्धन शेतीमधील विविधता व एकात्मिक शेती पध्दतीचा युवक शेतकऱ्यांना अंगीकार करावा असे सांगितले.

याप्रसंगी लोकनेते मारुतराव घुले पा. ज्ञानेश्वर स.सा. कारखान्याचे संचालक शिवाजीराव कोलते, जनता शिक्षण प्रचार मंडळ, दहिगाव-ने चे प्रशासकीय अधिकारी कारभारी नजन उपस्थित होते. तसेच केव्हिके चे शास्त्रज्ञ माणिक लाखे, नारायण निबे, प्रकाश बहिरट, प्रविण देशमुख, दत्तात्रय वंजारी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी प्रशिक्षणार्थी सोबत संवाद साधला. तसेच प्रदीप वाघमोडे, आदर्श खंडागळे, नामदेव चेडे, भाऊसाहेब चामुटे, निरपळ रोहीणी यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना प्रशिक्षण घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी प्रशिक्षण समन्वयक सचिन बडधे, नंदकिशोर दहातोंडे, इंजी. पाटील यांनी विशेष परीश्रम घेतले. कार्यक्रम सूत्रसंचालन सचिन बडधे यांनी केले तर प्रकाश हिंगे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या