जादूगार रिया कानवडे यशाचा झेंडा सातासमुद्रापार

संगमनेर शहर : तालुक्यातील निमगाव पागा या छोट्याशा गावातील जादूगार रिया हिने थेट जागतिक पातळीवर झेप घेण्याची किमया वास्तवात उतरविली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये तब्बल ११ देशांमध्ये झालेल्या स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

भोपाळमध्ये झालेल्या तिस्लिम या स्पर्धेत जादूगार रियाने मिळवलेल्या प्रथम क्रमांकबद्दल तिच्या या कामगिरीची दखल घेऊन श्रीलंका मॅजिशियन सोसायटी यांनी श्रीलंकेमध्ये होणाऱ्या गाला शोमध्ये भारतातून एकमेव लेडीज जादूगार म्हणून रियाची निवड केली आहे. श्रीलका मॅजिशियन सोसायटीचे अध्यक्ष लुकुरुवान आणि उपाध्यक्ष इमाईल झंगा यांनी कौतुक केले. श्रीलंका मॅजिशियन सोसायटीच्या वतीने २५, २६ व २७ फेब्रुवारी २०२२ रोजी होणाऱ्या गाला शो आणि कॉम्पिटिशन स्पर्धेसाठी रियाला भरभरून शुभेच्छा दिल्या. सध्या रिया इयत्ता ८वी मध्ये शिकत असून, तिचे वय १४ वर्षे आहे. संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात निमगाव बुद्रुक या गावी तिचे वास्तव्य आहे.

रियाला जादूच्या कलेचा वारसा तिच्या वडिलांकडून म्हणजेच जादूगार के. भागवत यांच्याकडून मिळाला.


निमगाव बुद्रुक सारख्या संगमनेर तालुक्यातील एका खेडेगावाचे नाव रियाने सातासमुद्रापलीकडे नेऊन पोहचवले आहे. आई-वडिलांच्या संस्काराला तिने योग्य न्याय दिल्यामुळे तिला जिल्हा फेडरेशन अ. नगर संचालक नानासाहेब कानवडे तसेच छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे, युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, प्रदेश कार्यध्यक्ष विश्वनाथ वाघ, अहमदनगर जिल्हाध्यक्ष इंजि आशिष कानवडे, इंजि. रोहित यादव, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष रविंद्र डुबे, संगमनेर तालुकाध्यक्ष इंजि गणेश थोरात, उपाध्यक्ष सचिन गांजवे, कृष्णा दुध उत्पादक डेरीचे चेअरमन रामनाथ कानवडे, गणेश फरगडे, अल्पसंख्याक युवक काँग्रेस सरचिटणीस अमीन शेख, सचिन(लाला)कानवडे, राहूल कानवडे, नितीन कानवडे, शहागड प्रतिष्टान चे निलेश डुबे, संपत कानवडे, सागर कानवडे, सुरज डुबे, संकेत कोल्हे, विक्रम डुबे आदींनी जादुगार रिया कानवडे श्रीलंका येथे फेब्रुवारी २०२२ महिन्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या