संत सावता माळी युवक संघाचे कार्य आदर्श व प्रेरणादायी - पद्मश्री पोपटराव पवार

राहुरी / बाळकृष्ण भोसले : श्री संत सावता माळी युवक संघ हा शिव- फुले-शाहू-आंबेडकरांबरोबरच श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या विचारावर अहमदनगर जिल्ह्यात सामाजिक कार्यक्रम राबवित असून त्यातून गोरगरीब, उपेक्षित तसेच शेवटच्या घटकातील सर्वसामान्यांना न्याय देण्याचे महत्त्वाचे काम होत असून हे त्यांचे कार्य निश्चितच समाजासाठी आदर्शवत व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आदर्श गांव हिवरे बाजारचे मा. सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

श्री संत सावता माळी युवा संघाच्या वतीने पद्मश्री पोपटराव पवार यांचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला, प्रसंगी ते बोलत होते. पोपटराव पवार पुढे बोलताना म्हणाले समाजात अनेक संघटना समाजिक कामात कार्यरत आहेत. त्यात सावता माळी युवक संघ अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार काढत हा संघ समाजप्रेमींनी याच उद्देशाने आणखी बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. संघ भविष्यात देखील समाजासाठी नेहमी अग्रेसर राहून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत राहण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

प्रसंगी श्री संत सावता माळी युवा संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, मार्गदर्शक गोरे डेंटल हॉस्पिटलचे संचालक डॉ सुदर्शन गोरे, नितीनजी डागवाले, ठाणगे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या