राहुरी शहर/अशोक मंडलिक : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्री संत सावता माळी युवा संघ व गोरे हॉस्पिटल माळीवाडा अहमदनगर यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित निबंध व चित्रकला चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ही स्पर्धा तीन गटात घेतली जाईल. प्राथमिक गट, माध्यमिक गट व खुला गट.
निबंध व चित्रकला स्पर्धा याचा विषय
१)सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य
२)सावित्रीबाई फुले यांचे महिलांच्या जीवनातील स्थान
३)सावित्रीबाई फुले नसत्या तर
या विषयावर ही चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा रविवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी ११ ते १२ वाजता डॉ गोरे डेंटल हॉस्पिटल, डॉ आंबेडकर रोड, कोहिनूर गार्डन अपार्टमेंट, माळीवाडा, अहमदनगर या ठिकाणी घेण्यात येईल.
तरी इच्छुक स्पर्धकांनी नगर शहर 9028306020, नगर ग्रामीण 9527697610 क्रमांकावर संपर्क करून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. या स्पर्धेला कोणतीही प्रवेश फी नसेल. तसेच चित्रकला व निबंध स्पर्धेचा वेळ हा एक तास असेल. स्पर्धकांनी स्पर्धे साठी लागणारे साहित्य स्वतः घेऊन यावे. निबंध स्पर्धेसाठी लागणारे व चित्रकला स्पर्धेसाठी लागणारे कागद आयोजकां मार्फत दिले जातील.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र ने सन्मानित करण्यात येईल. तसेच प्राथमिक, माध्यमिक व खुला गट यासाठी प्रत्येकी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस पारितोषिक स्वरूपात दिले जाईल .
तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन श्री संत सावता माळी युवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे यांनी केले आहे. तसेच डॉ सुदर्शन गोरे, दिपक साखरे, सुनील शिंदे यांनी स्पर्धेचे नियोजन केले आहे.
0 टिप्पण्या