करण गायकर मराठा नेतृत्वाचा नवा चेहरा - कानवडे

करण गायकर यांचा जन्म एका खेडेगावात झाला. बाजीराव या टोपणनावानेही ते ओळखले जातात. लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण त्यांना घरातून तसेच शाळेत मिळाली. नंतर अण्णासाहेब जावळे पाटलांच्या नेतृत्वाने त्यांच्या मनावर वारंवार हीच शिकवण बिंबवली गेली. पुढे शिव-शंभुचा आदर्श घेऊन ते सामाजिक क्षेत्रात उतरले. अ. भा. छावा संघटनेशी ते जोडले गेले. प्रारंभी शाखाप्रमुख, तालुका अध्यक्ष तद्नंतर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी या संघटनेत काम केले. त्याद्वारे त्यांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांना वाचा फोडली. मराठा आरक्षणासाठी मेळावे घेतले, आंदोलने केलीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अनेकदा ते रस्त्यावर उतरले. कामगारांचे प्रश्न सोडवले. एकजूट निर्माण मोर्चा म्हणून नाशिक जिल्ह्याची नोंद आहे, त्यासाठी सर्वप्रथम औरंगाबाद रोडवरील वरद लक्ष्मी लॉन्स येथे मेळावा घेऊन त्यांनी समाजबांधवांत मतपरिवर्तन करून त्यांना आवाहन केले. मराठा समाजाचे जिल्ह्यातील मोर्चाचे प्रतिनिधित्व केले. मराठा वसतिगृहाचा प्रश्न, मराठा मुलामुलींना 50 टक्के फी माफी, आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून अनेक तरुणांना बिनव्याजी कर्ज मिळवून देण्यासाठी योग्य पाठपुरावा करुन ते यशस्वी केले. आजही मराठा आरक्षण समिती, सरकार यांच्यासमवेत सतत चर्चा करून मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात कसे टिकवता येईल यासाठी करण गायकर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. राज्य सरकारवर दबाव तयार करण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाच्या बैठकांमध्ये सहभागी होऊन ही आंदोलन उभे करून करण गायकर यांनी प्रयत्न केले आहे. सरकारला धारेवर धरत नेहमीच आक्रमक शैलीत काम करतात.

छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनामुळे कुठलेही आंदोलन यशस्वी होईपर्यंत लढण्याची ताकद त्यांच्यात निर्माण झाली असे ते म्हणतात. धडक कामगार युनियनच्या माध्यमातून अभिजीत राणे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी कामगारांचे राज्यभर जाळे विणले व कामगारांच्या समस्यांना वाचा फोडली. राज्यातील आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यातील हजारो कामगारांना त्यांनी नोकर्या मिळवून दिल्या व कामगारांचे प्रश्न सोडवले. अनेक ठिकाणी धडक कामगार युनियनच्या शेकडो शाखांची उद्घाटने त्यांनी केले.

1 जानेवारी 2014 रोजी त्यांनी छावा क्रांतिवीर सेनेची स्थापना केली. संघटना महाराष्ट्रभर कार्यरत असून नाशिकसह, पुणे, संभाजीनगर, ठाणे, नवी मुंबई, अहमदनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड. बुलढाना, उस्मानाबाद यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, जळगाव, धुळे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, लातूर, रायगड, रत्नागिरी, अकोला, वाशिम, नागपूर आदी जिल्ह्यांत संघटनेची बांधणी केली. हजारो शाखा, लाखावर सभासद असलेल्या या संघटनेचा कमी कालावधीत झपाट्याने विस्तार झाला आहे. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव मिळावा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करून केंद्र व राज्य सरकारने आयात निर्यात धोरण आखावे यासाठी आजही या संघटनेतर्फे आंदोलने सुरु आहेत. मराठा क्रांती चळवळीत नाशिक जिल्ह्याच्या मोर्चात संघटनेचे कार्य मोलाचे आहे.

आरक्षण मिळावे म्हणून केलेल्या आंदोलनात अनेक तरुणांवर गुन्हे दाखल झालेत. ते मागे घ्यावेत यासाठी करण गायकर यांनी आपले सर्वस्व पणास लावले. मुंबई महामोर्चाच्या वेळी सरकारसोबत चर्चा करून मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात भूमिका स्पष्टपणे मांडल्यात.

तसेच हतबल, निराश झालेल्या गुंतवणूकदारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीची स्थापना करून गुंतवणूकदारांना दिलासा दिला. त्यांनी हा लढा यशस्वी केल्याने अखेर भाऊसाहेब चव्हाणला मुंबई पोलिसांनी अटक केली.

एखादे काम हाती घेतले की समर्पित भावनेने त्यात लक्ष घालून अगदी झपाटल्यासारखे त्यात स्वतःला झोकून देणारे लोक फारच दुर्मिळ असतात. करण गायकर त्यापैकीच एक. मराठा समाजाला एकत्र आणण्यात तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कार्यरत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पुढे आलेले नेतृत्व अशी गायकर यांची खरी ओळख आहे. छावा क्रांतीवर सेनेचे संस्थापक म्हणूनही गायकर परिचित आहेत.

करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली छावा प्रतिष्ठानतर्फे राज्यातील अनेक जिल्ह्यांत गड-किल्ल्यांचे संवर्धन अर्थात दुर्गसंवर्धन करण्यात येत आहे. राज्यभर प्रतिष्ठानचे 35,000 पेक्षा जास्त सदस्य आहेत. छावा क्रांतिवीर सेनेच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजन केले जाते. विविध प्रश्नावर केलेली आंदोलने व मोर्चे यामुळे त्यांना आत्तापर्यंत बिरसा मुंडा, भारत माता भूमिपुत्र, समाज भूषण, नाशिक रत्न आदी पुरस्कारांनी सन्मान झाला आहे. त्यांचे समाजकार्य असेच अविरतपणे चालू राहावे आणि त्यांच्या हातून समाजाची, शेतकऱ्यांची आणि दीनदुबळ्यांची अशीच सेवा घडो आणि त्यांना आणखी मानसन्मान प्राप्त होवोत हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त (दि.१ जानेवारी) त्यांना शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या जडणघडणीत हातभार लागो हीच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना.

इंजि. आशिष कानवडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष-छावा क्रांतिवीर सेना, अहमदनगर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या