इपीएस ९५ पेन्शनधारकांचे गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन

श्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने इपीएस ९५ पेन्शनधारकांच्या प्रलंबित पेन्शनवाढीच्या प्रश्नाबाबत विविध मागण्यांचे निवेदन गृहमंत्री व सहकार मंत्री ना.अमित शहा यांना दि १८ डिसेंबर रोजी प्रवरानगर येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शेतकरी परिषद कार्यक्रमाच्या वेळी खा.डॉ सुजय विखे यांच्या मार्फत देण्यात आले.

खा.सुजय विखे यांची भेट घेतली. त्यावेळी अहमदनगर जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, भगवंत वाळके, शेंडे, राम पवार आदी शिष्टमंडळाने खा.सुजय विखे यांना निवेदन दिले व वृद्ध इपीएस ९५ पेन्शनधारकांना सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी पेन्शन मिळावी आदी मागण्या त्यात नमूद केल्या आहेत. गेल्या ७ वर्षापसून पेन्शनवाढ प्रश्नावर केंद्र सरकार निर्णय घेत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

१९ डिसेंबरला आयोजित केलेले राष्ट्रीय अधिवेशन कोरोना प्रादुर्भावाचे व नाताळ सणाची गर्दीचे कारण पुढे करून पोलीस प्रशासनाने फक्त लखनौ येथे १४४ कलम लावण्यात आले होते. त्यामुळे ते अधिवेशन रद्द झाले. हजारो लोकांची रेल्वेची तिकिटे रद्द करावी लागली. प्रत्येकी येण्याजाण्यासाठी तिकिटाचा रद्द करण्याचा भुर्दंड रु २४०/-चे आसपास सहन करावा लागला. इतरत्र मात्र कार्यक्रमांना मुभा होती. अशा प्रकारे पेन्शनधारकांवर सरकार अन्याय करीत असल्याचे मत नगर जिल्हाध्यक्ष संपत समिंदर यांनी व्यक्त केले. जनजागृतीसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने देशभर मेळावे घेतले जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या