राहुरी शहर/अशोक मंडलिक : राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील अनेक वर्षापासून रस्त्याची दुरावस्था होती. गावाच्या सहकार्याने तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पै रावसाहेब खेवरे यांची भेट घेऊन कानावर घातले आणि प्रश्न सुटला.
शिवसेनेचे नेते ना. जलसंधरण मंत्री शंकरराव गडाख यांच्या निधीतून दोन किलोमीटर रस्ता देण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख खेवरे यांचे शिफारस पत्र घेताना शिवसेना राहुरी तालुका उपप्रमुख तथा सिनेअभिनेता खुडसरगाव समवेत परशुराम पवार, अनिल तुवर, रवी निशाणे आणि लाभधारक शेतकरी भाऊसाहेब पोपट पवार, आप्पासाहेब देठे, पांडुरंग पवार, कारभारी देठे, भरत निशाणे, नवनाथ पवार आदी उपस्थित होते. शिवसेना जिल्हाप्रमुख खेवरे यांचे समस्त ग्रामस्थ खुडसरगावच्या वतीने आभार मानले.
0 टिप्पण्या