अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी तालुक्यातील वरवंडी गावचे गोरक्षनाथ दादा कदम यांचे सुपुत्र अनिल गोरक्षनाथ कदम यांची जर्मनी येथे मास्टर ऑफ सायन्ससाठी निवड झाली आहे.
अनिल कदम यांनी मेकॅनिकल मध्ये बॅचलर डिग्री घेतली असून त्यानंतर त्याने ५ वर्षे टाटा समूहात अनुभव घेतला. सध्याच्या काळातील पुढच्या शिक्षणाचे महत्व लक्षात घेता त्याने विविध परीक्षांची तयारी करण्यास सुरवात केली. आणि शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले व त्याची बीबीडब्लु विद्यापीठात निवड झाली आहे. आता तो पुढील २ वर्षे तिथे शिक्षण घेणार आहे.
त्याच्या या यशाचे श्रेय त्याचे वडील, आई, भाऊ, चुलते, नातेवाईक आणि तमाम मित्र परिवाराला जाते. ज्यांनी वेळो वेळी त्याला मदत केली आणि मार्गदर्शन केले. याच प्रसंगी या क्षणाचे अवचित्त साधून गावातील वि.का.सो चेअरमन राजाबापु कदम, मोराया गृपचे गोरख अडसुरे, गोरक्षनाथ कदम, रघुनाथ कदम, जगन्नाथ अडसुरे, अशोक उंडे, विजय कदम, नानासाहेब कदम, दत्तु ढगे, दशरथ बरे, अच्युत कदम, साईनाथ कदम आदिंसह जेष्ठ व्यक्तींनी त्याचा सत्कार करून मनोबल वाढवले तसेच गावातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या