उर्जामंत्री डॉ. राऊतांच्या अध्यक्षतेत कोंचीत भरणार दुसरी जागतिक धम्म परिषद

राहुरी / बाळकृष्ण भोसले : संगमनेर तालुक्यातील कोंची येथील 'नालंदा धम्मभुमी' च्या भव्य प्रांगणात २७ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या 'जागतिक विश्वदीप धम्मपरीषद' निमित्ताने परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी महाराष्ट्राचे उर्जा मंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

यासंदर्भात नालंदा धम्मभुमीचे प्रमुख भदंत करुणानंदबोधी यांनी सांगितले की, २७ जानेवारी २०२२ रोजी ही जागतिक धम्मपरिषद आयोजित करण्यात आली असून या परिषदेमध्ये विविध प्रमुख ठराव मांडण्यात येणार असून समाजाच्या साहित्य, संस्कृती, व परंपरांविषयी चर्चासत्र होणार आहे. बरोबरच सामाजिक प्रश्नांवर विचारमंथन करण्यात येणार असून बहुजन समाज प्रबोधन साहित्याची दालने परिषदेदरम्यान लावण्यात येणार आहेत. या निमित्ताने वाचकांना प्रतिथयश साहित्यिकांचे दुर्मिळ साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या परिषदेला समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यानुषंगाने ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत यांची भेट घेऊन त्यांना परिषदेचे अध्यक्षस्थान स्विकारण्याची विनंती केली असून त्यांनी ते स्विकारण्याचे मान्य केले आहे.

ना. डॉ. राऊत यांच्या भेटीप्रसंगी भदंत करूणानंदबोधी व भंते विश्वदीप यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे प्रदेश कार्याध्यक्ष राजेशजी लाडे, फोरमचे प्रदेश महासचिव कृष्णा भंडारे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनु.जाती विभागाचे प्रदेश समन्वयक संजय भोसले, सेलचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजेद्र वाघमारे, फोरमचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, वैजापुर अध्यक्ष प्रविण खाजेवर, नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या