कृषि कामगार पतसंस्था नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार

राहुरी शहर/अशोक मंडलिक : महात्मा फुले कृषि विद्यापीठ कर्मचारी सेवकांची अग्रगण्य संस्था कृषी कामगार सहकारी पतसंस्था मर्या, म.फु.कृ.वि.,राहुरी येथील नवनिर्वाचित सभापती, उपसभापती व संचालकांचा सत्कार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस अभिवादन करून प्रमुख पाहुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राहुरी व जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक अरूण तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेंशी असणारे ऋणानुबंधाच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या प्रसंगी मफुकृवि, राहुरी चे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महाविरसिंग चौहान यांनी नुतन संचालक मंडळाचे अभिनंदन केले. कामगार सोसायटीचे माजी संचालक आबासाहेब वाघमारे उपस्थित होते. संस्थेच्या कामकाज व व्यवस्थापनाबाबत सद्यास्थितील अर्थिक सांपत्तिक माहिती सर्वांना दिली.

संस्थेचे नवनिर्वाचित सभापती संजय सुधाकर ठाणगे, उपसभापती संदिप भाऊसाहेब लवांडे, तसेच संस्थेचे नवनिर्वाचित संचालक जनार्दन महादेव आव्हाड, नितीन निळकंठ नागपुरे, अजित बापुसाहेब हरिश्चंद्रे, महेश अरूण पवार, देवेंद्र छबुराव वंजारे, महेश दिलीप तमनर, संदिप दादु साबळे, डॉ. पल्लवी रभाजी पाळंदे, श्रीमती ज्योतीबाला भिमराज भालेराव तसेच पंढरीनाथ पाटोळे, संस्थेचे सभासद परशुराम तोडमल, विशाल भोसले, संस्थेचे सचिव संदिप सोपान करपे व लिपिक रोहित मधुकर मुळे आदी उपस्थित होते. तसेच प्रसंगी संस्थेचे सभासद कै.श्री. माणिक नानासाहेब काचोळे यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या