कुणाचे खापर कुणाच्या डोक्यात “वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा” अजब कारभार...

सखोल चौकशी न करता पो. उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांचे निलंबन

राहुरी शहर/ अशोक मंडलिक - राहुरी कारागृह फोडून आरोपी पलायन प्रकरणी पोलीस अधिका-यासह सहा पोलीसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान केवळ एका आरोपीच्या जबाबावरून पोलीस अधिका-यांवर निलंबनाची कारवाई म्हणजे हे न उलगडणार कोड आहे. त्यामुळे वरिष्ठांनी केलेली ही कारवाई संशयाच्या भोवर्यात सापडली आहे. कोणत्या अधिकाऱ्यांला क्लिनचीट देण्यासाठी अशी कारवाई करण्यात आली ? असा सवाल आता दस्तुरखुद पोलीस वर्तुळातच विचारला जाऊ लागला आहे. पोलीस खात्यात आरोपीच्या जबाबाला महत्व देऊन अधिका-यांचे निलंबन करणे म्हणजे "कुणाचे खापर कुणाच्या डोक्यात" असे झाले आहे.

शुक्रवार १७ डिसेंबर रोजी राहुरी कारागृहाच्या मागील बाजुच्या खिडकीचे गज कापुन मोक्का गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या कुख्यात भांड टोळीतील मोरख्या सागर आण्णासाहेब भांड, किरण अर्जुन आजबे, सोन्याबापू मच्छिंद्र माळी, रवी पोपट लोंढे, जालिंदर मच्छिंद्र सगळगिळे पसार झाले होते. दरम्यान पोलीसांची गस्त सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्या पोलीस पथकाने तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन घटनास्थळी नाशिक पोलीस क्षेञाचे पोलीस महानिरीक्षक डाॅ. बी.जी.शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपुर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, डिवायएसपी राहुल मदने आंदींनी कारागृहाची पहाणी केली होती. त्यामध्ये आरोपींसह काहींचे जबाब हि नोंदविण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस हे.काॅ. संजय जाधव, संजय राठोड, बाळू चाबुकस्वार, मनिषा गुंड, राहिदास गुंडाळे आदिंचे निलंबन आदेश काढले आहेत. वास्तविक पहाता निलंबन करण्यात आलेल्या अधिका-यांनी खरच कर्तव्यात कसुर केला आहे काय? हे पुन्हा पडताळून फेरविचार करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

सुञांकडून समजलेली माहीती अशी की, चहा विकणा-या आरोपीने वरीष्ठाना दिलेल्या जबाबात सांगितले की आपण पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना आरोपीकडे मोबाईल असल्याची माहिती दिली होती. केवळ आरोपींच्या सांगण्यावरून पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. व ज्या कलमान्वय धाकराव यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्या कलमाचा वास्तवाशी संबंध नसल्याचे बोलले जात आहे. कारण धाकराव यांच्यावर पोलीस नियमावली भाग ३ कलम २०२(॥) ठपका ठेवत कारवाई केली आहे. सदर कलमात म्हटले आहे की, प्रत्येक जिल्हाच्या मुख्यालयाच्या हत्यारी पोलीस शिपायांना गार्ड कर्तव्याबाबद पद्धतशीर व वेळोवेळी सुचना दिल्या पाहीजेत व पोलीस उपनिरीक्षक यांनी तपासणीच्या वेळी तसे केल्याबद्दल पाहिले पाहिजे होते. माञ त्यादिवशी पोलीस उपनिरीक्षक धाकराव हे गस्त दरम्यान तालुक्यात फिरत होते. गस्त चालु असतानाच हि घटना घडली आहे. गस्त दरम्यान आरोपी पळाल्याचे समजताच त्यांनी तीन आरोपीही पकडलेले देखील आहेत. सदर कारागृह चेक करण्याआधीच आरोपीचे पलायन झाले आहे. जर कारागृह चेक करून आरोपीचे पलायन झाले असते तर धाकराव त्यांच्यावर कारवाई होने अपेक्षित होते. माञ तडकफडकी झालेल्या कारवाईने प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तसेच आरोपींनी ज्या जेलची पळून जाण्यासाठी खिडकीचे गज कापले आहेत ते इंग्रजांच्या काळातील म्हणजेच शीस घालून तयार केलेले आहे असे जुने नागरिक सांगतात. हे गज कापायचे असल्यास ती जेलमधील खिडकी जवळपास चवदा ते पंधरा फुटांपर्यंत उंच आहे. साध्य व्हयेक्स ब्लेंडने हाताने कापणे शक्य नाही किवा एका रात्रीचे काम नाही अशी चर्चा आहे. बाहेरील जाळी बाहेरच्या बाजूने वर करण्यात आलेली आहे. या अर्थी जेलच्या मागील बाजूने अत्याधुनिक औजाराने आधी जाळी व नंतर गज कट केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

वास्तविक पहाता चौकशी अधिकारी यांनी पोलिस ठाण्याचे जबाबदार अधिकारी यांनी त्यांच्या कार्यकाळात दिवसातून किती वेळा जेलची सुरक्षा तपासली आहे याची देखील चौकशी होणे गरजेचे होते. आरोपी ज्या जेलमध्ये होते त्या जेल मध्ये त्या रात्री १७ आरोपी होते. त्यांची देखील चौकशी होवून कारवाई होणे अपेक्षित होते परंतु तसे काहीही झालेले दिसत नाही. मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गंभीर आरोपींना तात्काळ नाशिक येथिल कारागृहात हलवने गरजेचे असतांना त्यांना राहुरी जेलला ठेवण्याचे कारण काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमाने जेल मध्ये आरोपीला भेटण्यासाठी रक्तातील नात्यातील लोकांना भेटण्याची परवानगी घेवून मुभा असते. परंतु राहुरी जेल समोर आरोपींना भेटणार्यांची कायमच गर्दी पहावयास मिळत असते. चौकशी दरम्यान व्हिडिओ रेकॉर्डीग व भेटची नोंदवही तपासली गेली की नाही यावर देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. कायद्यानुसार दुय्यम कारागृहात किती आरोपी ठेवण्यास परवानगी आहे ? व राहुरी येथिल कारागृहात किती कैदी ठेवले जातात किंवा आहेत ? याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. आरोपी पळून गेले त्या रात्री जे पोलिस कर्मचारी रात्री जेलच्या दिवटीला होते त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डीग तपासून कारवाई होणे गरजेचे होते.परंतु तसे काही झाले की नाही याची चर्चा घडत आहे.

पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांनी राहुरी पोलीस ठाण्याच्या सहा महिण्याच्या कारकिर्दीत भांड टोळीला मोक्का लावुन तालुक्यात कायद्याचा "धाक" निर्माण केला होता. शिवाय त्यातीलच सराईत गुन्हेगारास पकडण्यासाठी गुहा(ता.राहुरी) येथे त्यांनी आरोपीवर झडप घालली होती. त्या झटापटीत धाकराव हे जखमी देखील झाले होते. माञ एका चहावाल्या आरोपीच्या जबाबावरून कोणताही ठोस पुरावा नसतांना पो.उप.नि. धाकराव यांना आरोपी पळून जाणार असल्याची माहीती होती व त्यांनी वरिष्ठांना सदर माहिती दिली नाही असा ठपका ठेवण्यात आला. माञ ज्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणारे धाकराव हे आपला कामात खरच हलगर्जीपणा करतील का ? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे एकूणच ही कारवाई आणि चौकशी आहवाल संशयाच्या भोवर्यात सापडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या