शेती फायदेशीर, शाश्वत आणि हवामानास अनुकूल बनवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

प्राध्यापक जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. प्रवीण राव यांना एम एस स्वामीनाथन पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांमध्ये वैविध्यता आणण्यासाठी प्रोत्साहन देताना, शेती ही हवामान-अनुरूप, फायदेशीर, शाश्वत आणि उत्पादनक्षम बनवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आज केले.

देशातील कृषी उत्पादनात सूक्ष्म नियोजनाद्वारे विविधता आणण्याच्या गरजेवर भर देताना ते म्हणाले की, "तृणधान्यांचे उत्पादन कमी करत कडधान्ये, तेलबिया आणि इतर पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत".

प्राध्यापक जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. प्रवीण राव यांना‘एम एस स्वामिनाथन पुरस्कार’प्रदान करताना, त्यांनी ठिबक सिंचन आणि इतर सूक्ष्म सिंचन तंत्राद्वारे उत्तम पाणी व्यवस्थापनासह पिकांमध्ये वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या डॉ. राव यांच्या उत्कृष्ट कार्याची  प्रशंसा केली.भारतीय कृषी संशोधन परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटना (आरआयसीएआरईए ) आणि नुझिविदू सीड्स लिमिटेडद्वारे हा पुरस्कार दिला जातो. 

कृषी क्षेत्राला फायदेशीर बनवण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियाच्या भावनेने सुसंघटितपणे काम करण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी केले. "बहुसंख्य शेतकरी असंघटित असल्याने आणि त्यांना स्वतःचा असा आवाज नसल्यामुळे हे सर्व आवश्यक आहे".संसद, राजकीय नेते, धोरणकर्ते आणि प्रसारमाध्यमे या चार घटकांनी शेती आणि शेती क्षेत्राबद्दल बद्दल सकारात्मक दृष्टीकोन  स्वीकारावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आरोग्‍यवर्धक पदार्थांचे ब्रँड आणि विपणन करून मौल्यवान परकीय चलन मिळवण्याची यांची  प्रचंड क्षमता भारताकडे आहे, असेही  ते म्हणाले. केवळ मातीचेच आरोग्य नाही तर शेतकरी, शेत कामगार आणि ग्राहकांचे आरोग्य देखील सुनिश्चित करण्यासाठी कृषी रसायने आणि खतांचा वापर कमी करण्यासाठी धोरणे विकसित करण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी यावेळी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या