संत शिरोमनी संताजी महाराज जगनाडे यांची जयंती राहुरीत ठिकठिकाणी उत्साहात साजरी

संताजी महाराजांचे चरित्र सर्वांनी आचरणात आणावे- अरुण तनपुरे

राहुरी शहर/अशोक मंडलिक : राहुरी नगरपरिषदेच्या वतीने जगनाडे महाराज जयंती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा राहुरी तालुक्याचे जेष्ठ नेते अरुण तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.

जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अभंगगाथा लिहीण्याचे अनमोल कार्य संत शिरोमनी जगनाडे महाराजांनी केले आहे. हि गाथा वारकरी सांप्रादायाचा आत्मा आहे. अशा या संत श्रेष्ठ जगनाडे महाराजांची ३९८ वी जयंतीला शतशः प्रणाम राहुरी तालुक्यातील सर्व शासकीय निम शासकीय कार्यालयात संताजी महाराज जगनाङे यांची जयंती उत्साहात साजरी झाली.

या प्रसंगी राहुरी तहसील कार्यालयात श्रीरामपुर विभागिय कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी अनिल पवार, राहुरीचे कर्तव्यदक्ष तहसीलदार फसलोद्दीन शेख, राहुरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक राजेद्र इंगळे, कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार सौ. पुनम दंडिले मॅडम तसेच राहुरी नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष अनिल कासार, समाजाच्या नगरसेविका मुक्ताताई करपे, नगरसेवक संजय साळवे आणि नगरपरिषदेचे सुनिल कुमावत, आप्पासाहेब तनपुरे, बांधकाम विभागांतील काकड यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली.

पंचायत समितीच्या वतीने पंचायत समितीचे मा. उपसभापती रविंद आढाव आणि शासकीय कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तेली समाजाचे जेेष्ठ समाज सेवक गंगाधर शेजुळ, तेली समाजाचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ सोनवणे, शहराध्यक्ष संजय पन्हाळे, आबा महाराज शेजुळ, सुरेश धोत्रे, बाबासाहेब शेजुळ, किशोर इंगळे, बाबासाहेब शेजुळ, रावसाहेब शेजुळ, गणेश इंगळे, संतोष देहाडराय, विजय करपे, अजिक्य शेजुळ, संदिप सोनवणे व मान्यवर उपस्थित होते. आभार दत्तात्रय सोनवणे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या