निपुण भारत अभियान अंतर्गत प्रशालेत २० डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत गणित महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण व्हावी, गणितीय संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, त्यांच्या सर्जनशील विचाराला चालना मिळावी, नवनिर्मितीची बीजे रुजली जावीत म्हणून गणितीय रांगोळी, फलकलेखन, गणितीय चित्रकला स्पर्धा, गणित मेळावा, गणित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे वेगळेपण म्हणजे विद्यार्थ्यांनी भाजीपाला, खाद्यपदार्थ, स्टेशनरी साहित्य विक्री यांचा भरविलेला बाजार व त्याला विद्यार्थ्यांनी ग्राहक म्हणून दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात व्यवहारीक ज्ञान, कौशल्य प्राप्त व्हावी, खरेदी विक्री, नफा तोटा या संकल्पना स्पष्ट होऊन प्रत्यक्ष अध्ययन अनुभव मिळावेत म्हणून या गणित बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देखील एस.आर.देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ज्ञानेश्वर चाटुपळे तर आभार बाबासाहेब सोकटकर यांनी मानले. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी गणित शिक्षक मंगेश कानोले, मनोज बोराडे, किर्ती सनेर , सुरेखा जैन, बाबासाहेब सोकटकर, ज्ञानेश्वर चाटुपळे, विलास सोनजे, छाया डुबे, कलाशिक्षक अनिल साबळे सह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीऱ्यांनी परीश्रम घेतले.
0 टिप्पण्या