संगमनेर : म्हाडा (MHADA) कडून आज ( 12 डिसेंबर ) मुंबईत विविध पदांवर भरतीसाठी आयोजित परीक्षा अचानक रद्द करण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणामुळे ही परीक्षा रद्द करावी लागत असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Dr. Jitendra Awhad ) यांनी दिली आहे. काल रात्री उशिरा रात्री अचानक २:३० वा. त्यांनी ही माहिती ट्वीटर वर एका व्हिडीओ द्वारा देत परीक्षार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलिगीरी व्यक्त केली आहे. मात्र एनवेळेस परीक्षा रद्द झाल्याचं समजल्याने परीक्षा केंद्रांवर पोहचलेल्या विद्यार्थ्यांचा पुन्हा संताप अनावर झाला आहे.
कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता ( स्थापत्य ), सहाय्यक अभियंता ( स्थापत्य ), सहाय्यक निधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) या पदांसाठी आज सकाळ आणि दुपारच्या सत्राच्या परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र आता ही परीक्षा 2022 मध्ये आयोजित केली जाईल असे सांगण्यात आले आहे.
यापूर्वी एमपीएससी आणि आरोग्य विभागाच्या परीक्षा घेताना देखील असाच प्रकार समोर आला होता. राज्य सरकार कडून ऐन वेळेस परीक्षा रद्द होत असल्याने इतर जिल्ह्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या वेळेचा, पैशांचा नाहक चुरडा होतो. अचानक पेपरच्या काही तास आधी रात्री परीक्षा रद्द करणे म्हणजे भोंगळ कारभाराच म्हणावं लागेल, अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर बसेस बंद असल्याने खाजगी वाहनास जास्त पैसे मोजून एक दिवस आधी पोहोचले देखील आता सरकार ने त्यांना त्यांचा झालेला मानसिक त्रास तर भरून काढु शकत नाहीत मात्र त्यांना झालेला राहणीमान, प्रवास खर्च प्रति विद्यार्थी 3000 दयावा आणि गरीब विद्यार्थीची हेळसांड पुन्हा करू नये._ इंजि.आशिष कानवडे ( अहमदनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष-छावा क्रांतिवीर सेना )
बसेस बंद असल्याने मी संगमनेर येथुन मोठी कसरत करत माझ्या परीक्षा केंद्रावर बारामती येथे एक दिवस अगोदर पोहोचलो. मात्र पहाटे 5 वा मित्राकडुन समजले परीक्षा रद्द झाली. सरकार ने आमचा झालेला खर्च तरी निदान परत द्यावा._ अनिकेत कडसकर ( विद्यार्थी )
0 टिप्पण्या