डॉ.तनपुरे कारखाना राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्या अध्यक्षपदी इंद्रभान पेरणे

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखाना राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्या अध्यक्षपदी इंद्रभान पेरणे उपाध्यक्षपदी अर्जुन दुशिंग तर सचिवपदी सचिन काळे यांची निवड करण्यात आली आहे कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

कामगार युनियनच्या इतर कार्यकारिणीत सहसचिव सिताराम नालकर, खजिनदार बाळासाहेब तारडे, तर सदस्यपदी गजानन निमसे, नामदेव शिंदे, राजू सांगळे, नामदेव धसाळ, सुरेश तनपुरे, रामभाऊ ढोकणे, राजेंद्र गागरे, ईश्वर दुधे, रावसाहेब ढुस, सौ संगीता कोबरणे आदींची निवड करण्यात आली आहे.

युनियन च्या नूतन पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी सर्व सदस्यांनी एक मताने अध्यक्ष पदासाठी इंद्रभान पेरणे यांच्या नावाचा ठराव संमत केला. मागील दोन महिन्यापूर्वी कारखाना कामगारांच्या विविध प्रश्नासाठी इंद्रभान पेरणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले होते.

यावेळी सर्वच कामगारांनी पाठिंबा दिला होता. कामगारांचे अनेक प्रश्न या आंदोलनामुळे मार्गी लागले. त्यामुळे अध्यक्षपदाची धुरा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. कामगार व व्यवस्थापन यांच्यामध्ये योग्य समन्वय साधून सर्वांना अभिमान वाटेल असे काम करू असा विश्वास नूतन अध्यक्ष इंद्रभान पेरणे यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या