भाजपाच्या वतीने घरकुलच्या "ड" यादीत गरजवंत लाभार्थ्यांचा समावेश करण्याची मागणी

घरकुलच्या "ड" यादीत गरजवंत लाभार्थ्यांचा समावेश करण्यात यावा या मागणीचे निवेदन राहुरी पंचायत समितीचे बीडीओ खामकर यांना देताना किरण पाटील अंञे, बिपीन ताठे आदी मान्यवर...

राहुरी शहर/अशोक मंडलिक : राहुरी तालुक्यातील गावातील घरकुलांच्या "ड" यादीचा सद्यस्थितीला सर्वे सुरू असुन ग्रामपंचायतीनी ग्रामसभेच्या मंजुरीने घरकुलांच्या ड यादीचा प्रस्ताव दिला होता.

पंरतु मागिल सर्वे करताना ज्या पोर्टलवर सर्वे केला ती साईट ताञिंक कारणाने बंद झाल्याने पुर्ण यादीचा सर्वे झाला नाही. यामुळे बर्याच गरजुवंत लाभार्थी लाभापासुन वंचित राहणार आहेत. तरी या सर्वे होत असणार्या यादीत वगळलेल्या गरजुवंत लाभार्थ्यांना समाविष्ट करून घ्यावे अशा आशयाचे निवेदन राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोविंद खामकर यांना देण्यात आले.

सदर निवेदनावर भाजपाचे ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील अंञे, चिटणिस बिपीन ताठे, सरपंच अनिल अनाप, साञळ चे सरपंच सतिष ताठे, संदीप अनाप, ऋषीकेश अनाप यांच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या