देवळाली प्रवरा : आज सकाळी ८ वा. राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास राहुरी फॅक्टरी येथील मनसे च्या वतीने अभिषेक व पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. कर्नाटक येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा कर्नाटक राज्यात अपमान करणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्यासाठी कर्नाटक सरकारने कठोर पाऊले अजून उचलली नाहीय. त्या शिवद्रोहीस कठोर शासन करावे याकरिता पावले उचलावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना राहुरी फॅक्टरी तर्फे भाजप शाशित कर्नाटक सरकार विरोधात मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, राहुरी तालुकाध्यक्ष अनिल डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांना अभिषेक करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कर्नाटक सरकार विरोधात नारे-निदर्शने देऊन निषेध नोंदवीला आहे.
त्यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष संदेश पाटोळे, उपाध्यक्ष साहिल पठाण, तालुका सचिव अनिल गीते, प्रमोद विधाटे, नरेश गोरे, शुभम गीते, सौरभ निकम, यश सरोदे, गौरव निकम, कृष्णा चवले, राहुल कडू, कुणाल पवार आदी मनसैनिक आणि शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या