नेस्ले प्रणित हिलदारी अभियाना अंतर्गत वर्ल्ड माऊंटन डे निमित्त महाबळेश्वर येथे महास्वच्छता अभियान संपन्न

अहमदनगर/ जावेद शेख : नेस्ले प्रणीत हिलदारी अभियाना अंतर्गत स्त्री मुक्ती संघटना व रिसीटी द्वारे वर्ल्ड माउंटन डे च्या निमित्ताने भारतातील ५ पर्वतीय शहरांमध्ये (महाबळेश्वर, मसुरी, डलहाऊजी, नैनिताल, मुन्नार) हिलदारी अभियानाचा ०३ रा वर्धापन दिवस साजरा करण्यात येत आहे.

या अंतर्गत आज ११ डिसेंबर २०२१ रोजी येथील सुप्रसिद्ध मुंबई पॉईंट येथे महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद, वन विभाग, तहसीलदार कार्यालय, गाईड असोसिएशन, हॉटेल लोहोनो स्टेस बाय इस्प्रावा, ग्रामंचायत क्षेत्र महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमे दरम्यान एकूण ६८.८७ किग्र कचरा गोळा करण्यात आला. यात १४.०१ किग्र प्लास्टिक च्या बाटल्या, १६.६४ किग्र काचेच्या बाटल्या, चिप्स, बिस्कीट चे पाकिटे १९.३३ किग्र, प्लास्टिक पिशव्या ६.५२ किग्र, पुठ्ठा ९.४७ किग्र, घरगुती बायोमेडिकल कचरा २.९ किग्र इत्यादी प्रकारच्या कचऱ्याचा समावेश होता. मोहिमेदरम्यान उपस्थितांना मास्क, कॅप्स, टी- शर्ट, सॅनिटायझर व‘आय एम हिलदार’चे बॅजेस इत्यादी चे वाटप करण्यात आले.

सोशल मिडीयावर हिलदारी च्या एकंदरीतच ०३ वर्षाचा प्रवास, त्याचबरोबर या अभियानामुळे शहरातील लोक, पर्यटक, स्थानिक स्वराज्य संस्था, घनकचरा व्यवस्थापनासाठी काम करणारे कर्मचारी इत्यादीवर झालेल्या सकारात्मक परिणामाचा मागोवा घेणारी एक शॉर्ट फिल्म देखील प्रदर्शित करण्यात आली. मोहिमेच्या सुरुवातीला महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील म्हणाल्या कि, उघड्यावर पडणाऱ्या कचऱ्यामुळे एकंदरीतच पर्यावरण, वन्यजीव व मानवी जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. परंतु हिलदारी मुळे सर्व भागधारकांना कचरा वर्गीकरणाचे महत्व व त्याबाबतच्या जबाबदारीची जाणीव होण्यास मदत होते आहे. तसेच महाबळेश्वर चे वनक्षेत्रपाल श्रीकांत कुळकर्णी म्हणाले कि, सदर महास्वच्छता अभियान हे हिलदारी च्या आपला कचरा–आपली जबाबदारी या सामुहिक बदलाच्या व जबाबदारीच्या ब्रीदवाक्याचे प्रतिबिंब आहे.

सदर अभियानासाठी महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी पाटील, वनक्षेत्रपाल श्रीकांत कुळकर्णी, क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील बिरामणे, हिलदारीचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ मुकेश कुळकर्णी, हॉटेल लोहोनो चे गेस्ट रिलेशन मॅनेजर गौरी येवले, इन्स्टिड मॅनेजर सौरभ देशपांडे, गाईड असोसिएशनचे अध्यक्ष शहीद कुरेशी, बाळकृष्ण ढेबे, दत्तात्रय शिंदे, नासीर वारुणकर, शंकर शेलार, मेहबूब जुंद्रे, प्रभाकर भिंगारे, वन विभागाचे शंकर गुरव, रमेश गडदे, अभिनंदन सावंत, संतोष काळे, निलेश सपकाळ, राजू वारुणकर, संयुक्त वन व्यवस्थापन समिती भेकवली व क्षेत्र महाबळेश्वर चे सदस्य व इतरांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.

मोहिमेसाठी महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफझल भाई सुतार, सर्व सन्माननीय नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी व महाबळेश्वर पत्रकार संघाचे सहकार्य लाभले. सदर उपक्रमाच्या यशस्वीसाठी हिलदारी टीम च्या राम भोसले, सुजित पेंडभाजे, गणेश माचुतरे, अभिषेक जाधव, आकाश शिंदे, यासीन नालबंद, फैयाज वारुणकर, खाक्सरली पटेल, दुर्गेश जाधव, क्षितिजा जाधव, गौरी चव्हाण, अमृता जाधव, आरतिका मोरे, प्रतिमा बोडरे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या