पत्रकार संरक्षण समितीच्या तालुकाध्यक्षपदी काकासाहेब लेंडे यांची निवड


विलास लाटे/पैठण : न दैन्यम न पलयानम हे ब्रीद वाक्य घेऊन पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी संपूर्ण देशभरात कार्यरत असलेली शासन मान्यता प्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या पैठण तालुका अध्यक्षपदी काकासाहेब लेंडे यांची निवड करण्यात आली. निर्भीड पत्रकार व सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे आपले योगदान कायम देत असतात त्यांच्यावर एक जबाबदारी देत पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या आदेशावरून व औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुनील पाटील खराबे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

सामाजिक व पत्रकारिता आदी क्षेत्रात कार्यरत असून गुणवत्ता आणि कार्यक्षमता पाहून पत्रकार काकासाहेब लेंडे यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष पैलवान विजय गायकवाड, युवासेना चितेगाव शहर प्रमुख सुधिर लोखंडे, हिरापुरचे सरपंच प्रभाकर लेंडे, घारेगावचे सरपंच अशोक बारगळ, गणेश वल्ले, भागवत कुंटे, रुतिक साळुंके, महेश सरोदे, सुदर्शन गीते, राहुल कोठुळे, प्रकाश लेंडे, प्रदिप लेंडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या